ETV Bharat / state

ETV Special Report: मेळघाट ते गुजरात व्याघ्र संचारमार्गाचे भिजत घोंगडे; 9 वर्षांपासून वनविभागात प्रस्ताव धुळखात - जळगाव जिल्हा जैवविविधता समिती

9 वर्षांपूर्वी जळगाव वनविभाग, सातपुडा बचाव समिती तसेच वन्यजीवप्रेमींनी मेळघाट आणि सातपुड्यात असलेल्या वाघांच्या संवर्धनासाठी मेळघाट ते मुक्ताई-भवानी वनक्षेत्र, अनेर डॅम ते पुढे थेट गुजरात राज्यातील शूलपाणेश्वर अभयारण्यापर्यंत व्याघ्र संचारमार्ग तयार करण्याचा प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी नाशिक वन विभागाकडे पाठवला होता. मात्र, हा प्रस्ताव धूळखात पडला असून त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. असे उजागरे यांनी यावेळी सांगितले.

Melghat to Gujrat tiger corridor issue pending at last 9 years
मेळघाट ते गुजरात व्याघ्र संचारमार्गाचे भिजत घोंगडे
author img

By

Published : Jul 23, 2021, 1:52 PM IST

जळगाव - मेळघाट तसेच सातपुड्यातील वाघांचे संवर्धन व्हावे, त्यांची संख्या वाढावी, म्हणून 2011-12 पासून प्रस्तावित असलेला मेळघाट ते गुजरात राज्यातील शूलपाणेश्वर अभयारण्यापर्यंतचा व्याघ्र संचारमार्ग अजूनही कागदावरच आहे. 9 वर्षांचा कालावधी उलटून देखील या व्याघ्र संचारमार्गाचा साधा विस्तृत प्रकल्प अहवालही वनविभागाला तयार करता आलेला नाही. त्यामुळे वन्यजीवप्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्य शासनाने याप्रश्नी पुढाकार घेऊन कार्यवाही करायला हवी, अशी मागणी जळगाव जिल्हा जैवविविधता समितीचे सदस्य अभय उजागरे यांच्यासह वन्यजीवप्रेमींनी केली आहे.

मेळघाट ते गुजरात व्याघ्र संचारमार्गाचे भिजत घोंगडे

सातपुड्यातील वाघाच्या संवर्धनासाठी व्याघ्र संचारमार्ग -

वाघांचे अस्तित्त्व असलेले जंगल हे जैवविविधता आणि अन्नसाखळीने परिपूर्ण असलेले जंगल मानले जाते. मेळघाटसह सातपुडा पर्वतरांगांमध्ये वाघांचे अस्तित्त्व वेळोवेळी सिद्ध झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव वनविभागासह यावल अभयारण्यात पट्टेदार वाघांचे दर्शन झाले आहे. जिल्ह्यात वाघांचे अस्तित्त्व वेळोवेळी सिद्ध होत असताना वनविभागाकडून मात्र, वाघांच्या संवर्धनासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसून येत नाही. 9 वर्षांपूर्वी जळगाव वनविभाग, सातपुडा बचाव समिती तसेच वन्यजीवप्रेमींनी मेळघाट आणि सातपुड्यात असलेल्या वाघांच्या संवर्धनासाठी मेळघाट ते मुक्ताई-भवानी वनक्षेत्र, अनेर डॅम ते पुढे थेट गुजरात राज्यातील शूलपाणेश्वर अभयारण्यापर्यंत व्याघ्र संचारमार्ग तयार करण्याचा प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी नाशिक वन विभागाकडे पाठवला होता. मात्र, हा प्रस्ताव धूळखात पडला असून त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. असे उजागरे यांनी यावेळी सांगितले.

Melghat to Gujrat tiger corridor issue pending at last 9 years
मेळघाट ते गुजरात व्याघ्र संचारमार्गाचे भिजत घोंगडे

दोन ते अडीच हजार स्वेअर किलोमीटर जंगलाचा आहे समावेश -

मेळघाट ते मुक्ताई-भवानी वनक्षेत्र, अनेर डॅम ते पुढे थेट गुजरात राज्यातील शुलपाणेश्वर अभयारण्य असा हा प्रस्तावित व्याघ्र संचारमार्ग आहे. त्यात मेळघाटातील साधारणपणे 1 हजार स्वेअर किलोमीटर, जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील जळगाव वनविभाग, यावल वनविभागासह यावल अभयारण्य असे मिळून 500 ते 750 स्वेअर किलोमीटर आणि धुळे जिल्ह्यातील शिरपूर, पुढे गुजरात राज्यातील शूलपाणेश्वर अभयारण्य, डांग जिल्ह्यातील सुमारे 600 ते 750 स्वेअर किलोमीटर असे एकूण दोन ते अडीच हजार स्वेअर किलोमीटरचे वनक्षेत्र समाविष्ट करण्यात आले आहे. व्याघ्र संचारमार्गाच्या प्रस्तावात यातील मेळघाट ते अनेर डॅमपर्यंतचा मुख्य टप्पा आहे असे उजागरे यावेळी म्हणाले.

प्रयत्न होत नसल्याची वन्यजीवप्रेमींना खंत -

जळगाव वन विभागाच्या हद्दीत येणाऱ्या मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा, चारठाणा, डोलारखेडा भागात वाघांचा वावर आहे. काही वाघ हे नियमित संचार करत असतात. यावल वनक्षेत्रासह अभयारण्यातही वाघांचे अस्तित्त्व आहे. या भागातील वाघ जगवायचे असतील, तर व्याघ्र संचारमार्गाचे काम त्वरेने पूर्ण व्हायला हवे. परंतु, दुर्दैवाने वनविभागाच्या वतीने प्रयत्न होत नसल्याची खंत वन्यजीवप्रेमींना आहे. दीड वर्षांपूर्वी व्याघ्र संचारमार्गासाठी वनविभागाची बैठक झाली होती. या बैठकीत पुन्हा नव्याने प्रस्ताव तयार करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. तसेच प्रस्ताव तयार करण्यासाठी 10 जणांची समिती देखील गठीत करण्यात आली होती. मात्र, वनविभागाकडून अद्यापही प्रस्ताव तयार करण्यात आलेला नाही. यासंदर्भात बैठकांचे सत्र सुरू आहे. पण पुढे गाडी हलत नसल्याची स्थिती आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

वनक्षेत्र घटत असल्याने वाघ होताहेत विस्थापित -

सातपुडा पर्वतरांगांमध्ये वनक्षेत्र झपाट्याने कमी होत चालले आहे. वृक्षतोडीमुळे या भागात बाभूळ वनस्पतीची संख्या वाढत जात आहे. त्यामुळे हरिण, नीलगाय यासारख्या तृणभक्षी प्राण्यांची संख्या कमी होत आहे. म्हणून या भागातील वाघ देखील विस्थापित होत आहेत. अनेकदा या भागातील वाघ शिकारीच्या शोधात केळीच्या बागांमध्ये आल्याच्या घटना घडल्या आहेत. नीलगाय व हरणांची संख्या वाढवून वाघांच्या शिकारीला पोषक वातावरण उपलब्ध करणे गरजेचे आहे. तसेच मेळघाट व मुक्ताई-भवानी वनक्षेत्र दरम्यानचा बफरझोन तयार करून वाघांचा संचारमार्ग होणे गरजेचे आहे असे उजागरे यावेळी म्हणाले.

काय म्हणतात वन्यजीवप्रेमी ?

या विषयासंदर्भात जळगाव जिल्हा जैवविविधता समिती सदस्य अभय उजागरे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले की, मेळघाटासह सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या वाघांचा बचाव करण्यासाठी वाघांचे संचारमार्ग कायम ठेवणे गरजेचे आहे. मेळघाट ते अनेर डॅमपर्यंत वाघांच्या संचारमार्गासाठी प्रस्ताव 2011-12 मध्ये देण्यात आला होता. आता नव्याने प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात अनेक वाघ आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी शासनासह वनविभागाने देखील प्रयत्न करणे गरजेचे आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अंबाबर्वा वनक्षेत्रापर्यंत मेळघाट अभयारण्याचा बफर झोन मानला जातो. त्यानंतर जळगाव वनविभागासह यावल वनविभाग आणि यावल अभयारण्य, पुढे अनेर डॅम ते थेट गुजरात राज्यातील शूलपाणेश्वर अभयारण्यापर्यंत व्याघ्र संचारमार्ग तयार करण्याची गरज आहे. हा व्याघ्र संचारमार्ग तयार झाला तर सातपुड्यातील वाघ फक्त वाचणार नाहीत, तर त्यांची संख्याही वाढेल असे उजागरे म्हणाले.

सातपुड्यातील वाघांच्या मुक्त संचारासाठी आवश्यक -

वाघ हा प्राणी संचार करत असतो. नर आणि मादी वाघाला वास्तव्य करण्यासाठी विशिष्ट वनक्षेत्राची गरज असते. ते आपल्या वनक्षेत्रात दुसऱ्या वाघांना घुसू देत नाहीत. त्यासाठी व्याघ्र संचारमार्गाची खूप आवश्यकता आहे. याशिवाय वाघांचे एकाच परिवारात प्रजनन झाले तर ते अशक्त मानले जाते. अशा प्रजननातून जन्माला आलेले बछडे हे आजारांना लवकर बळी पडतात. हे टाळण्यासाठी दुसऱ्या वनक्षेत्रातील तसेच दुसऱ्या परिवारातील वाघांचा संयोग होऊन प्रजनन व्हायला हवे. असे प्रजनन झालेले वाघ हे सशक्त असतात. व्याघ्र संचारमार्ग असेल तर एका ठिकाणचे वाघ दुसऱ्या ठिकाणी म्हणजेच, मेळघाटातील वाघ थेट गुजरातच्या शूलपाणेश्वर अभयारण्यापर्यंत आणि शूलपाणेश्वरचा वाघ मेळघाटपर्यंत संचार करू शकतो. असेही अभय उजागरे यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.