ETV Bharat / state

एकनाथ खडसेंची १४ दिवसानंतर होणार 'ईडी'कडून चौकशी

author img

By

Published : Dec 30, 2020, 5:23 PM IST

माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना 'ईडी'ने चौकशीला हजर राहण्यासाठी 14 दिवसांची मुदत मंजूर केली आहे. ईडीच्या नोटिसीनुसार खडसेंना आज (30 रोजी) चौकशीला हजर रहावे लागणार होते. परंतु, कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने खडसेंनी वेळ मागून घेतला आहे.

Eknath Khadse to be questioned by ED
खडसेंनी ईडीला लिहिलेले पत्र

जळगाव - माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना 'ईडी'ने चौकशीला हजर राहण्यासाठी 14 दिवसांची मुदत मंजूर केली आहे. याबाबतची माहिती स्वतः खडसेंनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. भोसरीतील एका भूखंडाच्या व्यवहार प्रकरणी ईडीने खडसेंना नोटीस बजावली होती. त्यानुसार, खडसेंना आज (30 रोजी) चौकशीला हजर रहावे लागणार होते. परंतु, कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने खडसेंनी वेळ मागून घेतला आहे.

एकनाथ खडसे यांना भोसरी येथील जमीन खरेदीप्रकरणी चौकशीसाठी ‘ईडी’ने (सक्तवसुली संचालनालय) नोटीस बजावली आहे. त्यांना आज हजर राहण्याचे कळवण्यात आले होते. मात्र, खडसे यांनी हजर न राहता, चौकशीसाठी मुदत मागितली होती. त्याबाबत यांनी ‘ईडी’ला पत्रही दिले होते. त्यानुसार त्यांना ईडीने मुदत मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले. त्याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक माध्यमांना दिले आहे.

Eknath Khadse to be questioned by ED
खडसेंनी ईडीला लिहिलेले पत्र
काय म्हटले आहे पत्रात?खडसेंनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपल्याला 30 डिसेंबर रोजी मुंबई येथील ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत समन्स प्राप्त झाले होते. आपण या चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर होणार होतोच. मात्र, मध्यंतरी 28 डिसेंबर रोजी ताप, सर्दी व कोरडा खोकल्याचा सौम्य त्रास जाणवला. तपासणी अंती कोरोनासदृश्‍य आजाराची लक्षणे असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी कोरोनाची चाचणी घेतली. या चाचणीचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार 14 दिवसांची विश्रांती आवश्‍यक आहे. तसे आपण ईडी कार्यालयास कळवले. त्यांनी आपल्याला 14 दिवसांनंतर चौकशीला हजर होण्यास संमती दिली आहे. माझी प्रकृती बरी झाल्यावर आपण ईडीला चौकशीसाठी संपूण सहकार्य करणार आहोत, असे खडसेंनी पत्रात म्हटले आहे.

भोसरी एमआयडीसीतील भूखंडाचे आहे प्रकरण-

एकनाथ खडसे यांना पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील एका भूखंडाच्या खरेदी प्रकरणी ‘ईडी’ने चौकशीची नोटीस बजावली आहे. दरम्यान, याआधी देखील याच प्रकरणी खडसे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, प्राप्तिकर विभाग तसेच झोटिंग समितीने चौकशी केली होती. आता याच प्रकरणी एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. आज त्यांची चौकशी करण्यात येणार होती. या चौकशीसाठी ते जळगाव येथून मुंबई येथे आले आहेत. मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी ते आहेत. त्यांच्या समवेत पत्नी मदांकिनी खडसे व कन्या अॅड. रोहिणी खडसे आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.