ETV Bharat / state

एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण; आधी कन्येलाही झाला होता संसर्ग

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांना गुरुवारी सायंकाळी तातडीने उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात येणार आहे.

eknath khadse
एकनाथ खडसे
author img

By

Published : Nov 19, 2020, 5:31 PM IST

Updated : Nov 19, 2020, 6:13 PM IST

जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांना गुरुवारी सायंकाळी तातडीने उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात येणार आहे. त्यांची प्रकृती चांगली असून, कोणत्याही प्रकारचा धोका नको म्हणून त्यांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे.

एकनाथ खडसे - नेते, राष्ट्रवादी

एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याचा वैद्यकीय अहवाल गुरुवारी सायंकाळी प्राप्त झाला. मात्र, खडसेंची प्रकृती चांगली असून, कोणत्याही प्रकारचा धोका नको म्हणून त्यांनी मुंबईत उपचार घेण्याचा निर्णय घेतला आहे. खडसे गुरुवारी दुपारी जळगावात त्यांच्या मुक्ताई या निवासस्थानी असताना त्यांना वैद्यकीय चाचणीचा अहवाल प्राप्त झाला.

आधी कन्येलाही झाली आहे लागण-

याच आठवड्यात आधी खडसेंच्या कन्या तथा जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‌ॅड. रोहिणी खडसेंना यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांनी स्वतः आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे, असे त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर तसेच ट्विटर हँडलवर पोस्ट करत जाहीर केले होते. कोरोनाची लागण झाल्यामुळे आपल्या सर्वांपासून काही काळ दूर रहावे लागणार असल्याने वाईट वाटत आहे. परंतु, मी कोरोनाला लवकर हरवून आपल्या सर्वांमध्ये परत येईल, असा विश्वास अ‌ॅड. खडसेंनी वर्तवला होता.

खडसेंनी इतरांना केले काळजी घेण्याचे आवाहन-

एकनाथ खडसे यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे जाहीर केले आहे. गेल्या आठवडाभरात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली वैद्यकीय चाचणी करून घ्यावी, कोरोनाची लागण होऊ नये म्हणून इतरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन देखील खडसेंनी केले आहे. दरम्यान, मी लवकर कोरोनावर मात करून परत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - काय सांगता! केरळात 'कोरोना' नावाचे दुकान, महामारीच्या 7 वर्षांआधी ठेवले होते नाव

हेही वाचा - धारावीसह अनेक पुनर्विकास प्रकल्पांना 'घरघर'; तज्ज्ञांनी 'हा' दिला इशारा

Last Updated : Nov 19, 2020, 6:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.