ETV Bharat / state

एकनाथ खडसे हाच आमचा पक्ष! नाथाभाऊंनी पक्ष बदलला तर आम्ही त्यांच्या सोबतच - एकनाथ खडसे यांचे पक्षांतर

एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करावाच. त्यांनी राष्ट्रवादीत जावे. खडसे हे शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यास तालुक्याचे भविष्य अधिक सुधारेल, अशी भावना खडसे समर्थकांची व्यक्त केली.

Eknath Khadse
एकनाथ खडसे
author img

By

Published : Dec 20, 2019, 12:46 PM IST

जळगाव - भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी एकनाथ खडसे यांनी आयुष्यभर खूप कष्ट घेतले आहेत. राज्यात प्रतिकूल परिस्थिती असताना त्यांनी एकनिष्ठ राहून पक्ष वाढवला. परंतु, पक्षाला जेव्हा सुगीचा काळ आला, तेव्हा पक्षाने त्यांना खड्यासारखे बाजूला केले. हेच त्यांच्या परिश्रमाचे फळ आहे का? आता खडसेंनी अजून अपमान सहन न करता भाजपला रामराम करावाच, अशी उद्विग्न भावना खडसे समर्थकांनी व्यक्त केली आहे.

एकनाथ खडसे यांनी पक्ष बदलावा समर्थकांची मागणी

हेही वाचा... मिटकरींची संधी हुकली? राष्ट्रवादीकडून 'या' दोन सदस्यांची विधानपरिषदेवर वर्णी

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या पक्षावर नाराज आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर खडसेंच्या मुक्ताईनगरातील समर्थकांना काय वाटते? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, खडसे समर्थकांनी देखील भाजपकडून मिळणाऱ्या सापत्न वागणुकीवर नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा... #CAA : जामिया मिलिया विद्यापीठाची वेबसाईट हॅक

राज्यात 2014 मध्ये भाजप सत्तेत आल्यावर खडसेंना पद्धतशीरपणे डावलण्यात आले. त्यांच्यावरील एकही आरोप सिद्ध झालेला नसताना त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. एवढेच नव्हे तर विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाने तिकीट नाकारून अपमान केला. त्यांच्याऐवजी मुलीला तिकीट दिले. मात्र, त्यांचाही पक्षांतर्गत लोकांनी कुरघोड्या करत पराभव केला. या साऱ्या बाबी खडसेंवर अन्याय करणाऱ्या आहेत. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी कष्ट घेतल्यानेच भाजपची भरभराट झाली. मात्र, पक्षाने त्यांच्या कष्टाची जाण ठेवली नाही. खडसेंवर होणाऱ्या अन्यायाबद्दल केंद्रीय नेतृत्त्व देखील बोलायला तयार नाही. खडसेंनी भाजप सोडला तर काँग्रेसप्रमाणे भाजपलाही राज्यात उतरती कळा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब केंद्रीय नेतृत्त्वाने लक्षात घ्यायला हवी, अशा भावना काही खडसे समर्थकांनी यावेळी व्यक्त केल्या.

हेही वाचा... 'लोकांना वारंवार स्वतःच नागरिकत्व सिध्द करावं लागणं हेच क्लेशदायक''

खडसे हाच आमचा पक्ष

एकनाथ खडसे हाच आमचा पक्ष आहेत. ते ज्या पक्षात जातील, तो आमचा पक्ष असेल. त्यांचा कोणताही निर्णय आम्हाला मान्य असणार आहे. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असतील तर जळगाव जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांचा हा निर्णय योग्यच ठरणार आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच जायला हवे. भाजपमध्ये अजून अपमान सहन करणे योग्य होणार नाही, असेही काही समर्थकांनी सांगितले.

मुक्ताईनगरातून भाजपचे बॅनर, झेंडे गायब

एकनाथ खडसे भाजपवर नाराज असल्याने त्यांच्या समर्थकांमध्येही तीव्र नाराजी पसरली आहे. खडसेंच्या मुक्ताईनगरात भाजप विरोधी वातावरण असल्याची जवळून प्रचिती येत आहे. कधी काळी भाजपचे बॅनर, झेंड्यांनी भरलेल्या मुक्ताईनगर शहरात आता भाजपचा एक झेंडा अथवा बॅनर नजरेस पडत नाही. खडसेंच्या पक्षांतराची चर्चा सुरू असताना त्यांच्या संपर्क कार्यालयावरील भाजपचे बॅनर देखील हटवण्यात आले आहे. त्यामुळे खडसे समर्थकांचे डोळे आता आपल्या नेत्याच्या निर्णयाकडे लागले आहेत.

हेही वाचा.... VIDEO: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची विरोधीपक्षाला टोलेबाजी...

Intro:जळगाव
भाजपवाढीसाठी एकनाथ खडसे यांनी खूप कष्ट घेतले आहेत. राज्यात प्रतिकूल परिस्थिती असताना त्यांनी एकनिष्ठ राहून पक्ष वाढवला. परंतु, जेव्हा सुगीचा काळ आला, तेव्हा पक्षाने त्यांना खड्यासारखे बाजूला केले. हेच परिश्रमाचे फळ आहे का? आता खडसेंनी अजून अपमान सहन न करता भाजपला रामराम करावाच, अशी उद्विग्न भावना खडसे समर्थकांनी व्यक्त केली आहे.Body:भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या पक्षावर नाराज आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर खडसेंच्या मुक्ताईनगरातील समर्थकांना काय वाटते? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, खडसे समर्थकांनी देखील भाजपकडून मिळणाऱ्या सापत्न वागणुकीवर नाराजी व्यक्त केली. राज्यात 2014 मध्ये भाजप सत्तेत आल्यावर खडसेंना पद्धतशीरपणे डावलण्यात आले. त्यांच्यावरील एकही आरोप सिद्ध झालेला नसताना त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. एवढेच नव्हे तर विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाने तिकीट नाकारून अपमान केला. त्यांच्याऐवजी मुलीला तिकीट दिले खरे पण, त्यांचाही पक्षांतर्गत कुरघोड्या करून पराभव केला. या साऱ्या बाबी खडसेंवर अन्याय करणाऱ्या आहेत. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी कष्ट घेतल्यानेच भाजपची भरभराट झाली. मात्र, पक्षाने त्यांच्या कष्टाची जाण ठेवली नाही. भाजपत आता आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याची वृत्ती बळावली आहे. खडसेंवर होणाऱ्या अन्यायाबद्दल केंद्रीय नेतृत्त्व देखील बोलायला तयार नाही. खडसेंनी भाजप सोडला तर काँग्रेस प्रमाणे भाजपलाही राज्यात उतरती कळा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, ही बाब केंद्रीय नेतृत्त्वाने लक्षात घ्यायला हवी, अशा भावना काही खडसे समर्थकांनी यावेळी व्यक्त केल्या.

खडसे हेच आमचा पक्ष-

एकनाथ खडसे हेच आमचा पक्ष आहेत. ते ज्या पक्षात जातील, तो आमचा पक्ष असेल. त्यांचा कोणताही निर्णय आम्हाला मान्य असणार आहे. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असतील तर जळगाव जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांचा हा निर्णय योग्यच ठरणार आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच जायला हवे. भाजपत अजून अपमान सहन करणे योग्य होणार नाही, असेही काही समर्थकांनी सांगितले.Conclusion:मुक्ताईनगरातून भाजपचे बॅनर, झेंडे गायब-

एकनाथ खडसे भाजपवर नाराज असल्याने त्यांच्या समर्थकांमध्येही तीव्र नाराजी पसरली आहे. खडसेंच्या मुक्ताईनगरात भाजप विरोधी वातावरण असल्याची जवळून प्रचिती येत आहे. कधी काळी भाजपचे बॅनर, झेंड्यांनी भरलेल्या मुक्ताईनगर शहरात आता भाजपचा एक झेंडा, बॅनर नजरेस पडत नाही. खडसेंच्या पक्षांतराची चर्चा सुरू असताना त्यांच्या संपर्क कार्यालयावरील भाजपचे बॅनर देखील हटविण्यात आले आहे. खडसे समर्थकांचे डोळे आपल्या नेत्याच्या निर्णयाकडे लागले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.