ETV Bharat / state

गद्दारांवर शिस्तभंगाची कारवाई होणार - एकनाथ खडसे - News about the BJP

भाजपचे ज्येष्ठ नेते जे.पी नड्डा यांची ४ दिवसांपूर्वी भेट घेतली असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. पक्ष विरोधी कारवाई करणाऱ्या गद्दारांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे आश्वासन जे पी नड्डा यांनी दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

eknath-khadse-said-disciplinary-action-will-be-taken-against-those-who-take-action-against-the-party
भाजप नेते एकनाथ खडसे
author img

By

Published : Dec 26, 2019, 11:22 PM IST

जळगाव - भाजपचे ज्येष्ठ नेते जे. पी. नड्डा यांची 4 दिवसांपूर्वी आपण भेट घेतली. या भेटीत विधानसभा निवडणूक, राज्यातील राजकीय परिस्थिती संदर्भात चर्चा केली. स्वकियांनी पक्षविरोधी कारवाया केल्याने विधानसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला, याचीही माहिती दिली. माझे म्हणणे ऐकून घेत नड्डा यांनी चौकशीअंती जे दोषी असतील, त्या गद्दारांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.

भाजप नेते एकनाथ खडसे

हेही वाचा - 'सिंहासन' चित्रपटाप्रमाणे राज्याच्या राजकारणात घडामोडी घडताहेत - एकनाथ खडसे

लेवा एज्युकेशनल युनियनच्या शताब्दी महोत्सवाच्या समारोप समारंभासाठी एकनाथ खडसे गुरुवारी सायंकाळी जळगावला आले होते. या समारंभानंतर ते माध्यमांशी बोलत होते. खडसे पुढे म्हणाले, राज्याच्या काही भागात ज्या घटना घडल्या आहेत, त्यांचीही माहिती जे. पी. नड्डा यांना देण्यात आली आहे. पक्षाच्या आपल्याच कार्यकर्त्यांनी विरोधात काम केल्यामुळे काही ठिकाणी जागांना धक्का बसला. माझे म्हणणे ऐकून घेण्यात आले आहे. मी दिलेली माहिती तसेच पक्षाकडे असलेली माहितीच्या आधारे चौकशी करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्यासाठी नड्डा यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार तसेच पंकजा मुंडेंना भेटीसाठी दिल्लीत बोलावले आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नंतर बोलावले जाणार आहे. सर्वांच्या उपस्थितीत चर्चा करून चांगला निर्णय घेऊ. चौकशीत जे दोषी असतील, त्यांच्यावर निश्चितच शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे आश्वासन नड्डा यांनी दिल्याचे खडसे म्हणाले. दरम्यान, पक्षांतराच्या मुद्द्यावर त्यांनी बोलणे टाळले. उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देखील त्यांनी 'तो त्यांचा विषय आहे. मी काय बोलू', असे सांगितले. त्यामुळे खडसेंच्या पक्षांतराचा मुद्दा मागे पडल्याचे संकेत मिळत आहेत. कारवाईनंतरच कळेल, मी समाधानी की नाही.

हेही वाचा - 'उपयोगिता प्रमाणपत्र नसल्याने 65 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झालाच असावा'

पक्षाच्या भूमिकेसंदर्भात विचारणा केली असता खडसे म्हणाले की, पक्षाविरोधात कारवाया करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे, ही आपली अपेक्षा आहे. आता पक्षाच्या भूमिकेसंदर्भात मी समाधानी आहे किंवा नाही हे कारवाईनंतरच कळेल, असेही खडसे यावेळी म्हणाले.

Intro:जळगाव
भाजपचे ज्येष्ठ नेते जे. पी. नड्डा यांची 4 दिवसांपूर्वी आपण भेट घेतली. या भेटीत विधानसभा निवडणूक, राज्यातील राजकीय परिस्थिती संदर्भात चर्चा केली. स्वकियांनी पक्षविरोधी कारवाया केल्याने विधानसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला, याचीही माहिती दिली. माझे म्हणणे ऐकून घेत नड्डा यांनी चौकशीअंती जे दोषी असतील, त्या गद्दारांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.Body:लेवा एज्युकेशनल युनियनच्या शताब्दी महोत्सवाच्या समारोप समारंभासाठी एकनाथ खडसे गुरुवारी सायंकाळी जळगावात आले होते. या समारंभानंतर ते माध्यमांशी बोलत होते. खडसे पुढे म्हणाले, राज्याच्या काही भागात ज्या घटना घडल्या आहेत, त्यांचीही माहिती जे. पी. नड्डा यांना देण्यात आली आहे. पक्षाच्या आपल्याच कार्यकर्त्यांनी विरोधात काम केल्यामुळे काही ठिकाणी जागांना धक्का बसला. माझे म्हणणे ऐकून घेण्यात आले आहे. मी दिलेली माहिती तसेच पक्षाकडे असलेली माहितीच्या आधारे चौकशी करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्यासाठी नड्डा यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार तसेच पंकजा मुंडेंना भेटीसाठी दिल्लीत बोलावले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नंतर बोलावले जाणार आहे. सर्वांच्या उपस्थितीत चर्चा करून चांगला निर्णय घेऊ. चौकशीत जे दोषी असतील, त्यांच्यावर निश्चितच शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे आश्वासन नड्डा यांनी दिल्याचे खडसे म्हणाले. दरम्यान, पक्षांतराच्या मुद्द्यावर त्यांनी बोलणे टाळले. उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देखील त्यांनी 'तो त्यांचा विषय आहे. मी काय बोलू', असे सांगितले. त्यामुळे खडसेंच्या पक्षांतराचा मुद्दा मागे पडल्याचे संकेत मिळत आहेत.Conclusion:कारवाईनंतरच कळेल, मी समाधानी की नाही-

पक्षाच्या भूमिकेसंदर्भात विचारणा केली असता खडसे म्हणाले की, पक्षाविरोधात कारवाया करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे, ही आपली अपेक्षा आहे. आता पक्षाच्या भूमिकेसंदर्भात मी समाधानी आहे किंवा नाही हे कारवाईनंतरच कळेल, असेही खडसे यावेळी म्हणाले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.