ETV Bharat / state

धरसोड वृत्तीमुळे शिवसेनेची 'ही' अवस्था - एकनाथ खडसे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सत्ता स्थापनेच्या विषयासंदर्भात राज्यात घडलेल्या मोठ्या राजकीय भूकंपावर खडसेंनी आज मुक्ताईनगरात पत्रकारांशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

एकनाथ खडसे
author img

By

Published : Nov 23, 2019, 12:42 PM IST

जळगाव - राज्यातील जनतेने भाजप आणि सेना महायुतीला कौल दिला होता. मात्र, मध्यंतरीच्या काळात मुख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद झाल्याने सेनेने महायुतीमधून माघार घेतली. त्यानंतर राज्याच्या राजकारणातील समीकरणे बदलली. परंतु, महाविकासआघाडीत मने जुळलेली नसल्याने अजित पवार भाजपसोबत आले. या साऱ्या घटनाक्रमात आपल्या धरसोड वृत्तीमुळे शिवसेनेची आज अशी अवस्था झाली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी दिली आहे.

एकनाथ खडसे, भाजप नेते

सत्ता स्थापनेच्या विषयासंदर्भात राज्यात घडलेल्या मोठ्या राजकीय भूकंपावर खडसेंनी आज मुक्ताईनगरात पत्रकारांशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

खडसे पुढे म्हणाले, की शिवसेनेने स्वतःहून अशी वेळ आपल्यावर ओढवून घेतली आहे. भाजप आणि सेनेतील मतभेद हे चर्चेद्वारे सहज मिटू शकत होते. सेनेने एवढा आग्रह करणे योग्य नव्हते. हाच आग्रह सोडला नाही म्हणून आजचे हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्याच्या विकासासाठी स्थिर सरकार आवश्यक आहे. आणि स्थिर सरकारसाठी ज्या घडामोडी घडल्या आहेत, त्या योग्य आहेत. स्थिर सरकारसाठी जे पाऊल उचलण्यात आलेले आहे, ते महत्त्वाचे आहे, असेही खडसेंनी यावेळी सांगितले.

महाविकास आघाडीत एकमत नव्हतेच-

राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येत स्थापन केलेल्या महाविकास आघाडीत कधीही एकमत नव्हतेच. त्यात सर्वांना विश्वासात घेतलेले नव्हते. एकमेकांचे विचार, तत्त्व कधी जुळलेले दिसून आले नाही. केवळ सत्ता हवी म्हणून ते एकत्र आलेले होते. परंतु, आजच्या घडामोडींमुळे सेनेची पुरती गोची झाली आहे, असे म्हणता येईल, असेही खडसे म्हणाले.

Intro:जळगाव
राज्यातील जनतेने भाजप आणि सेना महायुतीला कौल दिला होता. मात्र, मध्यंतरीच्या काळात मुख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद झाल्याने सेनेने महायुतीमधून माघार घेतली. त्यानंतर राज्याच्या राजकारणातील समीकरणे बदलली. परंतु, महाविकास आघाडीत मने जुळलेली नसल्याने अजित पवार भाजपसोबत आले. या साऱ्या घटनाक्रमात आपल्या धरसोड वृत्तीमुळे शिवसेनेची आज अशी अवस्था झाली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी दिली आहे.Body:सत्ता स्थापनेच्या विषयासंदर्भात राज्यात घडलेल्या मोठ्या राजकीय भूकंपावर खडसेंनी आज मुक्ताईनगरात पत्रकारांशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. खडसे पुढे म्हणाले, शिवसेनेने स्वतःहून अशी वेळ आपल्यावर ओढवून घेतली आहे. भाजप आणि सेनेतील मतभेद हे चर्चेद्वारे सहज मिटू शकत होते. सेनेने एवढा आग्रह करणे योग्य नव्हते. हाच आग्रह सोडला नाही म्हणून आजचे हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्याच्या विकासासाठी स्थिर सरकार आवश्यक आहे. आणि स्थिर सरकारसाठी ज्या घडामोडी घडल्या आहेत, त्या योग्य आहेत. स्थिर सरकारसाठी जे पाऊल उचलण्यात आलेले आहे, ते महत्त्वाचे आहे, असेही खडसेंनी यावेळी सांगितले.Conclusion:महाविकास आघाडीत एकमत नव्हतेच-

राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येत स्थापन केलेल्या महाविकास आघाडीत कधीही एकमत नव्हतेच. त्यात सर्वांना विश्वासात घेतलेले नव्हते. एकमेकांचे विचार, तत्त्व कधी जुळलेले दिसून आले नाही. केवळ सत्ता हवी म्हणून ते एकत्र आलेले होते. परंतु, आजच्या घडामोडींमुळे सेनेची पुरती गोची झाली आहे. असे म्हणता येईल, असेही खडसे म्हणाले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.