ETV Bharat / state

Eknath Khadse on Devendra Fadnavis : फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरेंबाबत केलेले वक्तव्य वेदनादायी - एकनाथ खडसे - Devendra Fadnavis

एमआयएमसोबत शिवसेची युती झालेली नसतानाही दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा जनाब म्हणून उल्लेख करणे अत्यंत चुकीचे आहे. त्यांनी नैराश्येतून वक्तव्य केल्याचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे म्हणाले. फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे वेदना होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

एकनाथ खडसे
एकनाथ खडसे
author img

By

Published : Mar 22, 2022, 7:06 PM IST

जळगाव - एमआयएमसोबत शिवसेची युती झालेली नसतानाही दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा जनाब म्हणून उल्लेख करणे अत्यंत चुकीचे आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नैराश्येतून ते वक्तव्य केल्याची, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली. फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे वेदना होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

बोलताना एकनाथ खडसे

बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्त्वाचा प्रखर विचार मांडणारे नेते होते. राज्यात हिंदुत्व टिकवून ठेवण्याचे काम त्यांनी त्यांच्या लेखणीतून व वाणीतून केले आहे. 1993 दंगलीवेळी अनेक संघटना प्रतिकार न करता बसल्या होत्या. मात्र, त्यावेळी बाळासाहेब यांच्या आदेशानंतर शिवसेना रस्त्यावर उतरली, असेही खडसे म्हणाले. देवेंद्र फडणीस यांचे ते वक्तव्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मान्य नसेल, कारण नरेंद्र मोदी यांनी कायम बाळासाहेबांचा आदरच केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असे वक्तव्य आम्ही कधीच अनुभवले नव्हते, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.

हेही वाचा - Minor Girl Raped Jamner : धक्कादायक.. जळगावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत गाडीतच बलात्कार..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.