ETV Bharat / state

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गिरीश महाजन-सतीश पाटलांमध्ये खडाजंगी - meeting

जिल्हा नियोजन समितीची चालू पंचवार्षिकची शेवटची बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी पार पडली. महाजन आणि पाटील यांच्यातील शाब्दिक वादामुळे ही बैठक गाजली.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गिरीश महाजन-सतीश पाटलांमध्ये खडाजंगी
author img

By

Published : Jul 19, 2019, 8:25 PM IST

जळगाव - जिल्हा नियोजन समितीची बैठक जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. सतीश पाटील यांच्यात झालेल्या खडाजंगीमुळे चांगलीच गाजली. आगामी विधानसभा निवडणुकीत निवडून येण्याच्या मुद्यावरून दोघांनी एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान देत चिमटे काढले.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गिरीश महाजन-सतीश पाटलांमध्ये खडाजंगी

जिल्हा नियोजन समितीची चालू पंचवार्षिकची शेवटची बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी पार पडली. महाजन आणि पाटील यांच्यातील शाब्दिक वादामुळे ही बैठक गाजली. बैठक सुरू असताना गिरीश महाजनांनी सतीश पाटलांना उद्देशून 'त्यांची शेवटची बैठक आहे', असा चिमटा काढल्याने ठिणगी पडली. त्यावर सतीश पाटलांनी आक्रमक पवित्रा घेत 'मी आगामी विधानसभा निवडणुकीत तुमच्यापेक्षा जास्त मतांनी निवडून येऊन पुन्हा याच सभागृहात बसेन', असा पलटवार केला. महाजनांनी 'पहा बरं' असे सांगताच सतीश पाटील अधिक आक्रमक झाले. 'मागच्या निवडणुकीत मोदी लाट असताना मी खान्देशातून एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार म्हणून निवडून आलो. आता आगामी विधानसभा निवडणुकीत देखील मी निवडून येईल. निवडून आलो नाही तर बापाचे नाव लावणार नाही. तुमच्यात हिंमत असेल तर निवडणूक ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा. हे आव्हान सतीश पाटील देतोय, नाना पटोलेंचं हे आव्हान नाही, असा चिमटा देखील काढण्याची संधी सतीश पाटलांनी दवडली नाही.

लोकसभा निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात विकासकामे झाली नाहीत. त्यामुळे विविध योजनांचा कोट्यवधी रुपयांचा निधी अखर्चित राहिला. आता नियोजन करण्याऐवजी बैठकीत वेळकाढूपणा सुरू असल्याचा आरोप करत सतीश पाटील तावातावाने बैठकीतून बाहेर पडले. त्यानंतर वादावर पडदा पडला खरा. मात्र, दोघांमध्ये झालेल्या खडाजंगीमुळे उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन झाले.

बैठक सुरू असताना मी केवळ गंमतीत सतीश पाटलांना 'त्यांची शेवटची बैठक आहे', असे म्हटलो. पण त्यांनी ते मनावर घेतले. निवडून आलो नाही तर बापाचे नाव लावणार नाही, एवढ्या टोकाची भूमिका घेण्याची गरज नव्हती. पण तरीही त्यांनी दिलेले आव्हान मी स्वीकारले आहे. आगामी विधानसभा निवडणूक ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी त्यांनी करावी. हवे तर आम्ही मतदारांचे हात उंचावून मतदान घ्यायला तयार आहोत. त्यांनी निवडून येऊन दाखवावेच, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी बैठकीतील वादाविषयी बोलताना दिली.

Intro:जळगाव
जिल्हा नियोजन समितीची शुक्रवारी पार पडलेली बैठक जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. सतीश पाटील यांच्यात झालेल्या खडाजंगीमुळे चांगलीच गाजली. आगामी विधानसभा निवडणुकीत निवडून येण्याच्या मुद्यावरून दोघांनी एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान देत चिमटे काढले.Body:जिल्हा नियोजन समितीची चालू पंचवार्षिकची शेवटची बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी पार पडली. महाजन आणि पाटील यांच्यातील शाब्दिक वादामुळे ही बैठक गाजली. बैठक सुरू असताना गिरीश महाजनांनी सतीश पाटलांना उद्देशून 'त्यांची शेवटची बैठक आहे', असा चिमटा काढल्याने ठिणगी पडली. त्यावर सतीश पाटलांनी आक्रमक पवित्रा घेत 'मी आगामी विधानसभा निवडणुकीत तुमच्यापेक्षा जास्त मतांनी निवडून येऊन पुन्हा याच सभागृहात बसेल', असा पलटवार केला. महाजनांनी 'पहा बरं' असे सांगताच सतीश पाटील अधिक आक्रमक झाले. 'मागच्या निवडणुकीत मोदी लाट असताना मी खान्देशातून एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार म्हणून निवडून आलो. आता आगामी विधानसभा निवडणुकीत देखील मी निवडून येईल. निवडून आलो नाही तर बापाचे नाव लावणार नाही. तुमच्यात हिंमत असेल तर निवडणूक ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा. हे आव्हान सतीश पाटील देतोय, नाना पटोलेंचं हे आव्हान नाही, असा चिमटा देखील काढण्याची संधी सतीश पाटलांनी दवडली नाही.

लोकसभा निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात विकासकामे झाली नाहीत. त्यामुळे विविध योजनांचा कोट्यवधी रुपयांचा निधी अखर्चित राहिला. आता नियोजन करण्याऐवजी बैठकीत वेळकाढूपणा सुरू असल्याचा आरोप करत सतीश पाटील तावातावाने बैठकीतून बाहेर पडले. त्यानंतर वादावर पडदा पडला खरा. मात्र, दोघांमध्ये झालेल्या खडाजंगीमुळे उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन झाले.Conclusion:बैठक सुरू असताना मी केवळ गंमतीत सतीश पाटलांना 'त्यांची शेवटची बैठक आहे', असे म्हटलो. पण त्यांनी ते मनावर घेतले. निवडून आलो नाही तर बापाचे नाव लावणार नाही, एवढ्या टोकाची भूमिका घेण्याची गरज नव्हती. पण तरीही त्यांनी दिलेले आव्हान मी स्वीकारले आहे. आगामी विधानसभा निवडणूक ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी त्यांनी करावी. हवं तर आम्ही मतदारांचे हात उंचावून मतदान घ्यायला तयार आहोत. त्यांनी निवडून येऊन दाखवावेच, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी बैठकीतील वादाविषयी बोलताना दिली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.