ETV Bharat / state

एक नारद, शिवसेना गारद; देवेंद्र फडणवीसांचा 'बाण' - देवेंद्र फडणवीस जळगाव दौरा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस हे राज्यभर ठिकठिकाणी दौरा करत आहेत. बुधवारी जळगावात मुक्कामी थांबल्यानंतर गुरुवारी सकाळी ते जळगावातील दौऱ्याच्या कामाला लागले. तत्पूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

DEVENDRA FADNAVIS
विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Jul 9, 2020, 2:16 PM IST

जळगाव - कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुग्णांना योग्य उपचार मिळत नाहीत. एकीकडे अशी परिस्थिती असताना राज्याच्या सत्तेत असलेले तीनही पक्ष एकमेकांशी लढत आहेत. ही अवस्था योग्य नाही, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जळगावात राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. दरम्यान, यावेळी त्यांनी मोबाईलवरील एका संदेशाचा संदर्भ देत 'एक नारद, शिवसेना गारद', अशा शब्दांत टीका करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या मुलाखतीच्या टीझरच्या विषयावर चिमटा काढला.

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस हे राज्यभर ठिकठिकाणी दौरा करत आहेत. बुधवारी जळगावात मुक्कामी थांबल्यानंतर गुरुवारी सकाळी ते जळगावातील दौऱ्याच्या कामाला लागले. तत्पूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते बोलत होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, संपूर्ण देश आणि राज्य कोरोनाच्या संकटांशी सामना करत आहे. मात्र, राज्य सरकार उपाययोजना करण्यात कमी पडत आहे. रुग्णांना योग्य प्रकारे उपचार मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. कोरोनाशी लढा द्यायचा असेल तर टेस्टिंग वाढवल्या पाहिजेत. कोरोनाचे संक्रमण वाढत असताना राज्य सरकार उपाययोजना न करता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करत आहे. कोरोनासारख्या कठीण काळात फोडाफोडी आणि कुरघोडीचे राजकारण करणे योग्य नाही. कोरोनाशी लढा देण्यासाठी उपाययोजनांवर फोकस करण्याऐवजी सत्तेतील तीनही पक्ष एकमेकांशी भांडत आहेत, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

सामनाच्या टीकेवर आम्ही कधीही प्रतिक्रिया देत नाहीत

'सामना'तून होणाऱ्या टीकेबाबत पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, सामनाच्या टीकेवर आम्ही कधीही प्रतिक्रिया देत नाहीत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हा सामना राहिलेला नाही. तेव्हा सामना तत्त्वांसाठी काम करत होता. शिवसेनेचे ते मुखपत्र होते. पण आता बाळासाहेबांच्या तत्त्वांच्या विरोधात ज्यांची तत्त्वे आहेत, अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ते मुखपत्र झाले आहे. बाळासाहेबांनी कधीही आपल्या तत्त्वांच्या विरोधात काम केले नाही. आमच्या लेखी आज सामनाच्या टीकेला महत्त्व नाही, तर महत्त्व आहे ते कोरोनाच्या लढाईला, अशी प्रतिक्रिया यावेळी फडणवीस यांनी दिली.

मराठा आरक्षणाबाबत सरकारने प्रयत्न करावेत

मराठा आरक्षणाच्या विषयाबाबत प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, याप्रश्नी सरकारने न्यायालयीन लढाईत जास्तीत जास्त प्रयत्न करण्याची गरज आहे. आपल्या वकिलांच्या माध्यमातून सरकारने सर्व विषय मांडून कोणत्याही प्रकारचा विपरीत निर्णय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. मराठा आरक्षणाच्या विषयात आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत, असे त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.