ETV Bharat / state

लॉकडाऊनमुळे जळगावातील ७०० कोटींच्या विकासकामांना ब्रेक - latest jalgaon news

लॉकडाऊनमुळे जळगाव महापालिकेच्या वतीने शहरात होणाऱ्या सुमारे ७०० कोटी रुपयांच्या विकासकामांना ब्रेक लागला आहे. शिवाजीनगर उड्डाणपूल, केंद्र सरकारच्या अमृत योजनेच्या माध्यमातून सुरू असलेले पाणीपुरवठा योजनेचे काम, मलनिस्सारण योजना, महामार्गाचे चौपदरीकरण, ऑक्सिजन पार्क अशी अनेक आवश्यक कामे रखडली आहेत.

जळगाव
जळगाव
author img

By

Published : Apr 8, 2020, 5:02 PM IST

जळगाव - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनाच्या नियंत्रणासाठी देशभरात २४ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊनमुळे जळगाव महापालिकेच्या वतीने शहरात होणाऱ्या सुमारे ७०० कोटी रुपयांच्या विकासकामांना ब्रेक लागला आहे. शिवाजीनगर उड्डाणपूल, केंद्र सरकारच्या अमृत योजनेच्या माध्यमातून सुरू असलेले पाणीपुरवठा योजनेचे काम, मलनिस्सारण योजना, महामार्गाचे चौपदरीकरण, ऑक्सिजन पार्क अशी अनेक आवश्यक कामे रखडली आहेत.

लॉकडाऊनचा सर्वात मोठा परिणाम महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू असलेल्या विकासकामांवर झाला आहे. जळगाव शहरवासी गेल्या काही वर्षांपासूून शहरात संथगतीने सुरू असलेल्या विकासकांमुळे त्रस्त आहेत. आता लॉकडाऊनमुळे जमावबंदी लागूू आहे. त्यामुळे चारपेक्षा जास्त नागरिक एकत्र येऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत शहरात सुरू असलेल्या सर्व विकासकामांना ब्रेक लागला आहे.

अमृत योजनेचे कामही थांबले-

शहरात केंद्र सरकारच्या अमृत योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजनेचे काम सुरू आहे. त्यात पाणीपुरवठा योजनेचे काम जवळपास ५० टक्के पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे, पाणीपुरवठा योजनेची मुदत नोव्हेंबर २०१९ मध्येच संपली होती. महापालिकेने अद्याप कामाला मुुदतवाढ दिलेली नाही. अशा परिस्थितीत आता लॉकडाऊनमुळे कामाला ब्रेक लागल्याने जे काम दिवाळीपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. तेच काम आता २०२१ पर्यंत रखडण्याची शक्यता आहे. मलनिस्सारण योजनेचे काम अद्याप १५ टक्केच झाले आहे. ५ महिन्यांपासून हे काम सुरू होते. मात्र, सद्यस्थितीत मलनिस्सारण योजनेचेही काम थांबले आहे. या कामाला २८ महिन्यांची मुदत निर्धारित करण्यात आली आहे. मात्र, आता लॉकडाऊन वाढल्यास महापालिकेला या कामासाठी मुदतवाढ द्यावी लागणार आहे. यासह ऑक्सिजन पार्कचेही काम थांबले आहे.

शिवाजीनगरवासियांची अडचण कायम-

शिवाजीनगरवासीयांसह तब्बल ५ लाख नागरिकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेला शिवाजीनगर उड्डाणपुलाचा प्रश्नही मार्गी लागलेला नाही. या उड्डाणपुलाचे काम आधीच संथगतीने सुरू होते. आता लॉकडाऊनमुळे या कामाला पुन्हा एकदा विलंब होणार आहे. या पुलाचेही काम पूर्ण होण्यास अजून वर्षभराचा काळ जाणार आहे. त्यामुळे ५ लाख नागरिकांना अजून काही महिने त्रास सहन करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे शहरातून गेलेल्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामही रखडले आहे. जूनपर्यंत हे काम होणे अपेक्षित होते. मात्र, लॉकडाऊनमुळे हे काम थांबल्यामुळे ते आता ऑक्टोबर अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

'त्या' ५० कोटींच्या कामांना मंजुरीही रखडली-

शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय बिकट आहे. अशा परिस्थितीत महापौर भारती सोनवणे यांनी महापालिका फंडातून ५० कोटी रुपयांच्या निधीतून रस्त्यांची कामे तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महापालिकेने अंदाजपत्रक देखील तयार केले होते. मात्र, अंदाजपत्रक तयार झाले असले तरी महासभेच्या मंजुरीमुळे निविदा काढण्यासाठी मर्यादा आहेत. १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्यामुळे महासभा होऊ शकत नाही. त्यातच लॉकडाऊन उघडले तरी महासभा होईल की नाही, याबाबत साशंकता आहे. शहरात २५ कोटी रुपयांच्या कामातून सुुरू असलेली कामेही रखडली आहेत. २५ कोटी रुपयांच्या निधीला ३१ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, कामे झाली नाही तर हा निधीही पुन्हा परत जाण्याची भीती आहे.

काही महत्त्वाची कामे दृष्टीक्षेपात-

-अमृत पाणी पुरवठा योजना : २५० कोटी
-मलनिस्सारण योजना : २९० कोटी
-महामार्गाचे चौपदरीकरण : ७० कोटी
-शिवाजीनगर उड्डाणपूल : ३२ कोटी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.