ETV Bharat / state

रखडलेली जळगाव-मुंबई विमानसेवा उद्यापासून सुरू होणार - jalgaon flight services news

ट्रू-जेट विमान कंपनीने नांदेड येथील विमानसेवा रद्द करत मंगळवारपासून जळगावातून मुंबईसाठी विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता जळगाव ते मुंबई विमानसेवा पूर्ववत होणार असल्याने व्यापारीवर्गाला दिलासा मिळणार आहे.

रखडलेली जळगाव-मुंबई विमानसेवा उद्यापासून सुरू होणार

author img

By

Published : Jun 22, 2020, 7:27 PM IST

जळगाव - गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेली जळगाव ते मुंबई विमानसेवा उद्यापासून (मंगळवारी) सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. ट्रू-जेट विमान कंपनीने नांदेड येथील विमानसेवा रद्द करत जळगावातून मुंबईसाठी विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने गेल्या तीन दिवसांपासून शहरातून अहमदाबाद येथील विमानसेवा बंद ठेवण्यात आली आहे. आता जळगाव ते मुंबई विमानसेवा पूर्ववत होणार असल्याने व्यापारीवर्गाला दिलासा मिळणार आहे.

जळगाव विमानतळावरून पुरवण्यात येणारी विमानसेवा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे बंद होती. ती गेल्या 5 जूनला लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर देशांतर्गत विमानसेवेला परवानगी दिल्याने जळगाव ते अहमदाबाद या रुटला ट्रू-जेट या सेवा पुरवणाऱ्या विमान कंपनीने सुरुवात केली आहे. पण, मुंबई विमानतळावर वेळ न उपलब्ध (स्लॉट) नसल्याने ट्रू-जेट कंपनीला आठवड्यातून केवळ एकच दिवस सेवा देण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. तो स्लॉट नांदेडसाठी वापरण्यात येत होता. मात्र, जळगावातून मुंबईसाठी अधिक मागणी असल्याने कंपनीतर्फे मंगळवारपासून जळगावातून मुंबईसाठी फ्लाइट सुरू करण्याचे नियोजन केले आहे.

जळगाव-अहमदाबाद विमानसेवा बंदच -

जळगाव-अहमदाबाद हि 5 जूनपासून सुरू करण्यात आलेली विमानसेवा गेल्या तीन दिवसांपासून तांत्रिक कारणामुळे बंद पडली आहे. कंपनीच्या विमानातील पार्ट खराब झाल्याने ही सेवा बंद करण्यात आली आहे. ही सेवा कधी पूर्ववत होईल, याबाबत निश्चित माहिती मिळाली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.