ETV Bharat / state

दीपिका आणि खुशीवर कोसळले आभाळ; क्रूर नियतीने हिरावून घेतली आई अन् भावंड

author img

By

Published : Feb 16, 2021, 1:14 AM IST

किनगाव येथे रविवारी मध्यरात्री ट्रक उलटून घडलेल्या भीषण अपघातात 15 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताने संपूर्ण जिल्हाच नव्हे, तर राज्य हळहळले. या अपघातामुळे रावेर तालुक्यातील आभोडा गावातील दीपिका आणि खुशीवर या दोघी चिमुरडींवर आभाळच कोसळले आहे.

deepika and khushi lost her mother and brother in road accedent in jalgaon
दीपिका आणि खुशीवर कोसळले आभाळ; क्रूर नियतीने हिरावून घेतली आई अन् भावंड

जळगाव - जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथे रविवारी मध्यरात्री ट्रक उलटून घडलेल्या भीषण अपघातात 15 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताने संपूर्ण जिल्हाच नव्हे, तर राज्य हळहळले. या अपघातामुळे रावेर तालुक्यातील आभोडा गावातील दीपिका आणि खुशीवर या दोघी चिमुरडींवर आभाळच कोसळले आहे. क्रूर नियतीने त्यांची आई कमलाबाई, बहीण शारदा आणि भाऊ गणेश या तिघांना हिरावून घेतले आहे. या घटनेने दोघी बहिणी अक्षरशः भेदरल्या आहेत.

दीपिका आणि खुशी

दोन्ही बालिकांवर ओढवले मोठे संकट -

किनगावजवळ घडलेल्या अपघातात दीपिका आणि खुशी या दोन्ही बालिकांवर मोठे संकट ओढवले आहे. या अपघातात दोघांची आई, बहीण आणि भाऊ या तिघांचा मृत्यू झाला आहे. या दोघींचे वडील रमेश मोरे हे दोन वर्षांपूर्वी घरातून निघून गेले. मोलमजुरी करून त्यांची आई कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. मात्र, अपघातात त्यांची आईच हिरावली गेली आहे. त्यामुळे या घटनेने दोघी भेदरलेल्या आहेत. आपल्या घराभोवती झालेली ग्रामस्थांची गर्दी पाहून नेमके काय झाले, हे देखील त्यांना कळत नव्हते. खुशीला तर अजून नीट कळतही नाही. मात्र, तिच्यापेक्षा दीड वर्षांनी मोठी असलेल्या दीपिकाला आई आपल्याला सोडून गेल्याची जाणीव झाली आणि तिने हंबरडा फोडला. हे बघून लहानगी खुशीही तिला बिलगून रडू लागली. यावेळी उपस्थित नातेवाईकांसह ग्रामस्थांचे डोळे पाणावले.

एकाच कुटुंबातील 10 जणांचाही मृत्यू -

या अपघातात आबोडा गावातील एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू झाला आहे. अशोक वाघ या कुटुंब प्रमुखासोबत त्यांचा मुलगा सागर, पत्नी संगीता, अविवाहित पुतण्या नरेंद्र, अशोक यांची बहीण कमलाबाई मोरे, दुसरी बहीण सुमन इंगळे, भाची शारदा मोरे, विवाहित भाची दुर्गाबाई भालेराव, भाचा गणेश मोरे आणि भाचे जावई संदीप भालेराव यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. आभोडा गावातीलच सबनूर हुसेन तडवी आणि त्यांचा मुलगा दिलदार हुसेन तडवी या दोघांचाही मृत्यू झाला आहे. तडवी कुटुंबाचे गावात स्वतःचे घरदेखील नाही. हातमजुरी करून हे कुटुंब आपला चरितार्थ चालवत होते.

बहरण्यापूर्वीच मोडून पडला संसार -

या अपघातात दुर्गाबाई भालेराव यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा काही महिन्यांपूर्वीच रावेर तालुक्यातील विवरा येथील संदीप युवराज भालेराव यांच्याशी विवाह झाला होता. या अपघातात दुर्गाबाई यांचा मृत्यू झाला. त्यांचा संसार बहरण्यापूर्वीच मोडून पडला. दुर्गाबाई या अपघातात मरण पावलेल्या सुमनबाई इंगळे यांच्या मुलगी आहेत. या दुर्घटनेत आई, मुलगी आणि जावई यांचे एकाच वेळी निधन झाले.

घराचा आधारस्तंभ सरफराजही गेला -

केऱ्हाळा येथील सरफराज तडवी या शिक्षित युवकाचादेखील अपघातात मृत्यू झाला. त्याला रोजगार नसल्याने तो मोलमजुरी करत होता. तडवी कुटुंबात तो एकमेव कमवता व्यक्ती होता. त्याच्या मृत्यूने घर उघड्यावर पडले आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन लहान मुली असा परिवार आहे. हे कुटुंब पोरके झाले आहे. तसेच या अपघातात सरफराज याचे मित्र सत्तार तडवी व युनूस तडवी हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - अमरावतीत सोमवारी आढळले 449 नवे कोरोनाबाधित, 4 जणांचा मृत्यू.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.