ETV Bharat / state

टाळेबंदीमुळे दूध विक्रीत 30 ते 35 टक्क्यांची घट

author img

By

Published : Apr 24, 2021, 4:18 PM IST

कोरोना महामारीचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला देखील कोरोनाचा फटका बसला असून, दूध संघाची आर्थिक घडी विस्कटली आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे दूध विक्रीवर निर्बंध आले आहेत. अशा परिस्थितीत दूध संघाच्या दूध विक्रीत सुमारे 30 ते 35 टक्के घट झाली आहे.

टाळेबंदीमुळे दूध विक्रीत 30 ते 35 टक्क्यांची घट
टाळेबंदीमुळे दूध विक्रीत 30 ते 35 टक्क्यांची घट

जळगाव - कोरोना महामारीचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला देखील कोरोनाचा फटका बसला असून, दूध संघाची आर्थिक घडी विस्कटली आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे दूध विक्रीवर निर्बंध आले आहेत. अशा परिस्थितीत दूध संघाच्या दूध विक्रीत सुमारे 30 ते 35 टक्के घट झाली आहे. दूध संघाकडून दररोज संकलित होणाऱ्या साडेतीन ते पावणे चार लाख लीटर दुधापैकी 25 ते 30 हजार लीटर दूध पडून राहत आहे. शिल्लक राहणाऱ्या या दुधाची पावडर तयार करण्यावाचून दुसरा पर्याय दूध संघासमोर नाही.

जळगाव जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात मोलाचा वाटा असलेल्या दूध संघाला कोरोनामुळे सद्यस्थितीत मोठा फटका बसला आहे. संपूर्ण जिल्हाभरातील दूध उत्पादक सोसायट्या तसेच दूध उत्पादकांकडून दूध संघ दररोज साडेतीन ते पावणे चार लाख लीटर दुधाचे संकलन करतो. त्यापैकी दीड ते पावणे दोन लाख लीटर दुधाची विक्री होते. उर्वरित दुधापासून दूध पावडर, तसेच बटर, श्रीखंड, तूप असे बाय प्रॉडक्ट्स तयार केले जातात. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाच्या निर्देशानुसार किराणा माल, फळे व भाजीपाला तसेच दूध विक्रीसाठी वेळेचे बंधन घालून दिले आहे. या अत्यावश्यक सेवा आता दररोज सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतच सुरू असतात. दुपारनंतर किराणा दुकाने, दूध डेअरी, दुधाचे बूथ बंद राहत असल्याने किरकोळ विक्रेत्यांनी दूध संघाकडून दुधाची उचल पूर्वीपेक्षा निम्म्याहून अधिक प्रमाणात कमी केली आहे. त्यामुळे दूध संघाची दूध विक्री 30 ते 35 टक्क्यांनी घटली आहे.

बटर, दूध पावडरची निर्मिती

दूध संघाच्या नियोजनाबाबत बोलताना दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये म्हणाले की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने शहरासह जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी 7 ते 11 वाजेदरम्यानच व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. दूध विक्रेत्यांना देखील या 4 तासातच आपला व्यवसाय करावा लागत आहे. त्यामुळे दूध संघाची दूध विक्री 30 ते 35 टक्के घटली असून, दररोज 25 ते 30 हजार लीटर दूध शिल्लक राहत आहे. या दुधापासून दूध पावडर किंवा बटर निर्मिती करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. दूध डेअरी व हॉटेल्स बंद असल्याने बाय प्रॉडक्ट्सची मागणीही कमी आहे. म्हणून आम्ही बटर आणि पावडर निर्मितीसाठी मालेगावच्या प्लांटमध्ये दूध पाठवत आहोत. विक्रेत्यांकडून दुधाची मागणी घटल्याने खूप फटका बसला आहे. शिवाय शिल्लक राहणाऱ्या दुधापासून जे पावडर आणि बटर तयार होत आहे, त्याच्या विक्रीची देखील चिंता आहे. त्याला चांगला दर मिळाल्याशिवाय आम्हाला ते विकता येत नाही. अशा परिस्थितीत दूध संघाची आर्थिक स्थिती विस्कटली आहे.

जोखीम नको म्हणून विक्रेत्यांनी घटवली मागणी

दूध संघाच्या वतीने शहरात ठिकठिकाणी दूध विक्रीचे बूथ उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे. शहरात असे सुमारे साडेचारशे दूध विक्रीचे बूथ आहेत. त्याठिकाणी दूध उत्पादक संघाकडून सुमारे 80 ते 90 हजार लीटर दुधाची विक्री दररोज केली जाते. तर इतर दूध शहरातील हॉटेल व्यावसायिक तसेच डेअरी चालकांना दिले जाते. सद्यस्थितीत अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी 7 ते 11 वाजेदरम्यान व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अशा स्थितीत दूध केंद्रांवर ग्राहक हे सकाळीच येत असतात. सायंकाळी दुकाने बंद राहत असल्याने दूध केंद्र चालकांनी दूध उत्पादक संघाकडून घेण्यात येणारे दूध बंद केले आहे. केवळ सकाळच्या वेळी; ते ही मर्यादित स्वरुपात दूध विकत घेतले जात आहे. 80 टक्के दूध केंद्र चालकांनी दूध घेणे बंद केले आहे. त्यामुळे दूध संघाच्या विक्रीवर मोठा परिणाम आहे.

हॉटेल्स, आईस्क्रीम पार्लर बंद

दूध उत्पादक संघाकडे दुधाची मागणी कमी झाल्याचे मुख्य कारण म्हणजे, शहरातील हॉटेल्स व आईस्क्रीम पार्लर बंद आहेत. त्यामुळे दुधाची मागणी मोठ्या प्रमाणावर घटली आहे. हॉटेल्स बंद असल्याने बटर व पनीरची मागणी घटली आहे. त्यामुळे दुधाच्या मागणीवर साहजिकच परिणाम झाला आहे. आईस्क्रीमची दुकाने बंद असल्याने दुधाची मागणी थांबली आहे. त्याचाही फटका ही दूध संघाला सहन करावा लागत आहे.

हेही वाचा - राज्यात लॉकडाऊन लागू; परप्रांतीय मजुरांनी धरली गावाकडची वाट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.