ETV Bharat / state

जळगावातील 'त्या' १९ जणांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी 'डेथ ऑडिट' सुरू

कोरोना संशयित परंतु अहवाल निगेटिव्ह आलेल्या व श्वसनाचा विकार असलेल्या १९ जणांचे मृत्यू झाले आहेत. या लोकांच्या मृत्यूचे निश्चित कारण काय? याचा शोध घेण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनातर्फे 'डेथ ऑडिट' सुरू आहे.

author img

By

Published : Apr 20, 2020, 9:25 PM IST

जळगाव - जिल्ह्यात गेल्या २० दिवसांत कोरोना संशयित परंतु अहवाल निगेटिव्ह आलेल्या व श्वसनाचा विकार असलेल्या १९ जणांचे मृत्यू झाले आहेत. या लोकांच्या मृत्यूचे निश्चित कारण काय? याचा शोध घेण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनातर्फे 'डेथ ऑडिट' सुरू आहे.

कोरोना रुग्णालयात संशयित म्हणून दाखल व थुंकीचा अहवाल निगेटिव्ह आलेल्या १९ रुग्णांचा गेल्या २० दिवसांत मृत्यू झाला आहे. या सर्वांना श्वसनाचा विकार असल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 'सारी'मुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या गत आठवड्यात ५०पेक्षा अधिक होती. त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेकडूनही दररोज 'सारी'चा अहवाल देण्याचे आदेश आहेत. मृत्यू झालेल्या रुग्णांवर काय उपचार केले आहेत? ते प्रोटोकॉलनुसार झाले का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी शासकीय महाविद्यालय मेडिसीन विभाग, पेडियाट्रिक विभाग, फॉरेन्सिक विभागप्रमुखांच्या समितीद्वारे सर्वच २८९ रुग्णांच्या ट्रिटमेंट पेपरची तपासणी सुरू आहे.

दरम्यान, संबंधित सर्व रुग्णांचा मृत्यू सारी आजारानेच झाला की अन्य आजाराने झाला? यावर आरोग्य यंत्रणा अजूनही ठाम नाही. आधीच जळगाव जिल्ह्यावर कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे कुठलाही अधिकृत वैद्यकीय दुजोरा न घेता संबंधितांचा मृत्यू सारी या आजाराने झाल्याचा संभ्रम निर्माण केला जात आहे. या संवेदनशील बाबीची जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने गंभीर दखल घेत संबंधित सर्वांचा मृत्यू नेमका कोणत्या आजाराने झाला? त्याची कारणे कोणती? मागील वर्षी काही असे मृत्यू झालेत का? याचा शोध घेण्याचे आदेश शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दिले आहेत. त्यानुसार आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. चौकशी तसेच अभ्यासाअंती संबंधितांच्या मृत्यूचे कारण लवकरच समोर येईल, अशी माहिती जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिलीय.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.