ETV Bharat / state

पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमावर गुन्हा, बापाच्या अत्याचाराने पीडितेने सोडले घर - investigation

दोन वर्षांपासून तिचा बाप तिच्यावर अत्याचार करत होता. या प्रकाराला कंटाळल्याने पीडित मुलीने ८ जूनला घर सोडले होते. नाशिकहून ती विदर्भ एक्सप्रेसने प्रवास करत असताना मध्यरात्रीच्या सुमारास जळगाव येथे तिला रेल्वे सुरक्षा बलच्या पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले होते. चौकशी दरम्यान सुरुवातीला ती काहीही बोलत नव्हती.

पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमावर गुन्हा
author img

By

Published : Jun 11, 2019, 11:00 PM IST

जळगाव - स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नाशिक येथील एका नराधम बापावर जळगाव लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ वर्षांपासून वडील अत्याचार करीत असल्यामुळे पीडितेने घर सोडले होते. रेल्वेने प्रवास करत असताना सुदैवाने तिला जळगाव लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला.

पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमावर गुन्हा

पीडित मुलगी ही 14 वर्षाची असून ती नाशिक शहरातील पंचवटी भागातील रहिवासी आहे. दोन वर्षांपासून तिचा बाप तिच्यावर अत्याचार करत होता. या प्रकाराला कंटाळल्याने पीडित मुलीने ८ जूनला घर सोडले होते. नाशिकहून ती विदर्भ एक्सप्रेसने प्रवास करत असताना मध्यरात्रीच्या सुमारास जळगाव येथे तिला रेल्वे सुरक्षा बलच्या पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले होते. चौकशी दरम्यान सुरुवातीला ती काहीही बोलत नव्हती. मात्र, पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन चौकशी केल्यावर तिने, पालक आपल्याला फॅशनेबल राहू देत नाही म्हणून मी घर सोडून आली आहे, असा जबाब दिला होता. त्यावेळी पोलिसांनी तिला घरी परत जाण्याचा सल्ला दिला. परंतु, ती घरी जायला तयार नव्हती. म्हणून तिला पोलिसांनी बालसुधारगृहात रवाना केले होते. तेथे बालकल्याण अधिकारी तसेच बालसुधारगृहाच्या अधीक्षिका जयश्री पाटील, समतोल प्रकल्पाच्या व्यवस्थापक सपना श्रीवास्तव यांनी तिचा जबाब घेतला. जबाबात तिने वडील आपल्यावर अत्याचार करीत असल्याचे सांगितले. ही बाब बालसुधारगृहाकडून लोहमार्ग पोलिसांना तात्काळ कळविण्यात आली. त्यानंतर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल चेरुरकर, अनिंद्र नगराळे, विजय जाधव यांनी फिर्याद घेतली.

याप्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आल्यावर पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात तिच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाल्याने सोमवारी जळगाव लोहमार्ग पोलिसांनी तिच्या वडिलांविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करून घेत तो शुन्य क्रमांकाने नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्यात वर्ग केला. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी मंगळवारी प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर दुपारी पीडितेला सोबत घेऊन जळगाव लोहमार्ग पोलिसांचे पथक नाशिकला रवाना झाले.

Intro:जळगाव
स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नाशिक येथील एका नराधम बापावर जळगाव लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून वडील अत्याचार करीत असल्यामुळे पीडितेने घर सोडले होते. रेल्वेने प्रवास करत असताना सुदैवाने तिला जळगाव लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला.Body:पीडित मुलगी ही 14 वर्षाची असून ती नाशिक शहरातील पंचवटी भागातील रहिवासी आहे. दोन वर्षांपासून तिचा नराधम बाप तिच्यावर अत्याचार करत होता. या प्रकाराला कंटाळल्याने पीडित मुलीने 8 जून रोजी घर सोडले होते. नाशिकहून ती विदर्भ एक्सप्रेसने प्रवास करत असताना मध्यरात्रीच्या सुमारास जळगाव येथे तिला रेल्वे सुरक्षा बलच्या पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले होते. चौकशी दरम्यान सुरुवातीला ती काहीही बोलत नव्हती. मात्र, पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन चौकशी केल्यावर तिने, पालक आपल्याला फॅशनेबल राहू देत नाही म्हणून मी घर सोडून आली आहे, असा जबाब दिला होता. त्यावेळी पोलिसांनी तिला घरी परत जाण्याचा सल्ला दिला. परंतु, ती घरी जायला तयार नव्हती. म्हणून तिला पोलिसांनी बालसुधारगृहात रवाना केले होते. तेथे बालकल्याण अधिकारी तसेच बालसुधारगृहाच्या अधीक्षिका जयश्री पाटील, समतोल प्रकल्पाच्या व्यवस्थापक सपना श्रीवास्तव यांनी तिचा जबाब घेतला. जबाबात तिने वडील आपल्यावर अत्याचार करीत असल्याचे सांगितले. ही बाब बालसुधारगृहाकडून लोहमार्ग पोलिसांना तात्काळ कळविण्यात आली. त्यानंतर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल चेरुरकर, अनिंद्र नगराळे, विजय जाधव यांनी फिर्याद घेतली. याप्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आल्यावर पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात तिच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाल्याने सोमवारी जळगाव लोहमार्ग पोलिसांनी तिच्या वडिलांविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करून घेत तो शून्य क्रमांकाने नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्यात वर्ग केला.Conclusion:दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी मंगळवारी प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर दुपारी पीडितेला सोबत घेऊन जळगाव लोहमार्ग पोलिसांचे पथक नाशिकला रवाना झाले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.