जळगाव- जिल्ह्यातील भुसावळ नगरपालिकेतर्फे भिकाऱ्यांचे कोरोना लसीकरण केले जात आहे. भुसावळ शहरातील रेल्वे स्टेशन, बसस्टँड तसेच विविध भागात फिरणाऱ्या भिकाऱ्यांना पकडून आणून त्यांना कोव्हीशिल्ड लस दिली जात आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आतापर्यंत 60 भिकाऱ्यांना लस देण्यात आली आहे. 18 वर्षांपुढे वय असणाऱ्या भिकाऱ्यांना ही लस दिली जात आहे. रस्त्यावर राहणाऱ्या भिकाऱ्यांना व त्यांच्यामुळे इतरांना कोरोना संसर्ग होऊ शकतो. ते कोरोनाचे सुपरस्प्रेडर ठरू शकतात, हे लक्षात घेऊन त्यांना कोरोनाची लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, पोलीस प्रशासनाच्या मदतीने ही लसीकरण मोहीम राबवली जात आहे. लसीकरणापूर्वी प्रत्येक भिकाऱ्यांची रॅपिड व अँटीजन टेस्ट करण्यात आली. त्यात निगेटिव्ह असणाऱ्यांना लगेचच कोव्हीशिल्ड लस देण्यात आली.
अनेकांनी भीतीने काढला पळ
हेही वाचा-चार महिन्यानंतर पहिल्यांदाच रुग्णसंख्या दहाच्या आत