ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या 'पॉझिटिव्हिटी रेट'मध्ये घसरण; पण 'डाऊनफॉल'बाबत तज्ज्ञांमध्ये संभ्रम - जळगाव कोरोना बातमी

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा रिकव्हरी रेट (रुग्ण बरे होण्याचे प्रमाण) हळूहळू वाढत आहे. सध्या जिल्ह्याचा रिकव्हरी रेट हा 87.99 टक्के इतका आहे. जिल्ह्यात संसर्गाने पीक लेव्हल ओलांडल्यानेच रिकव्हरी रेट वाढला आहे, असे निरीक्षण आरोग्य यंत्रणेने नोंदवले असले तरी दुसऱ्या लाटेची तीव्रता लक्षात घेता कोणत्याही प्रकारचा दावा याबाबत केला जाऊ शकत नाही, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Apr 25, 2021, 8:06 PM IST

Updated : Apr 25, 2021, 8:14 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा वेग कायम आहे. मात्र, अलीकडे काही दिवसांपासून नव्याने बाधित येणारे आणि कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जवळपास समप्रमाणात असते. ही स्थिती पाहता कोरोनाच्या 'पॉझिटिव्हिटी रेट'मध्ये घसरण झाल्याचे हे संकेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील संसर्गाच्या स्थितीने पीक लेव्हल (संसर्गाची अतिउच्च पातळी) ओलांडली आहे, असे मानले जात आहे. पण तज्ज्ञांमध्ये याबाबत संभ्रम आहे. जिल्ह्यात पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांच्या टक्केवारीत घसरण झाली असली तरी उपाययोजनांच्या बाबतीत जिल्हा प्रशासन दक्ष आहे. आताच्या स्थितीत संसर्गाचा वेग पाहून केलेल्या उपाययोजना यापुढेही कायम असणार आहेत. सध्या चाचण्या देखील वाढल्या आहेत, एकूण चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची टक्केवारी आधीच्या तुलनेत कमी झाली आहे. हा एकप्रकारे आरोग्य यंत्रणेसाठी दिलासा मानला जात आहे. आगामी काही आठवड्यात जिल्ह्यातील वाढता संसर्ग कमी होईल, अशी आशा तज्ज्ञांना आहे.

बोलताना जिल्हाधिकारी

कोरोनाबाधितांची संख्या सव्वा लाखांच्या उंबरठ्यावर

सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ही सव्वा लाखांच्या उंबरठ्यावर आहे. यात 96 हजार 153 रुग्णांनी कोरोना हरवले आहे. राज्यात दुसरी लाट धडकल्यानंतर मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढायला सुरुवात झाली. जळगावात देखील याच काळात कोरोना हातपाय पसरू लागला. गेल्या दीड महिन्यात संसर्ग प्रचंड वेगाने पसरला. सध्या जिल्ह्यात 11 हजार 193 सक्रिय रुग्ण असून त्यातील 3 हजार 394 रुग्णांना लक्षणे आहेत तर 7 हजार 799 रुग्णांना लक्षणे नाहीत. संसर्गाचा वेग कायम दिसत असला तरी अलीकडे नव्याने बाधित येणारे रुग्ण आणि कोरोनातून बरे होणारे रुग्ण यांची संख्या जवळपास समप्रमाणात राहत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संसर्गाने अत्युच्च पातळी गाठून आता 'डाऊनफॉल' सुरू झाला असावा, असा अंदाज आहे.

जिल्ह्यात वाढतोय 'रिकव्हरी रेट'

जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यात कोरोनाचा रिकव्हरी रेट (रुग्ण बरे होण्याचे प्रमाण) हळूहळू वाढत आहे. सध्या जिल्ह्याचा रिकव्हरी रेट हा 87.99 टक्के इतका आहे. जिल्ह्यात संसर्गाने पीक लेव्हल ओलांडल्यानेच रिकव्हरी रेट वाढला आहे, असे निरीक्षण आरोग्य यंत्रणेने नोंदवले असले तरी दुसऱ्या लाटेची तीव्रता लक्षात घेता कोणत्याही प्रकारचा दावा याबाबत केला जाऊ शकत नाही, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

चाचण्यांचे वाढले प्रमाण

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर आरोग्य यंत्रणेकडून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला. महिनाभरापूर्वी जिल्ह्यात दररोज सुमारे 5 ते 6 हजार चाचण्या केल्या जात होत्या. त्यात एक हजार किंवा त्यापेक्षा जास्त बाधित रुग्ण आढळत होते. म्हणजेच तेव्हा पॉझिटिव्हिटी रेट हा सुमारे 20 ते 22 टक्के होता. आता रॅपिड अँटीजन तसेच आरटीपीसीआर या दोन्ही प्रकारातील चाचण्यांची संख्या वाढवण्यात अली असून, दिवसाला सुमारे 10 हजारांच्या जवळपास चाचण्या होत आहेत. कधी कधी तर चाचण्यांचा 10 हजारांचा टप्पा पार होत आहे. यात एक हजारांच्या आसपास बाधित रुग्ण समोर येत आहेत. यात पॉझिटिव्हिटी रेट 12 ते 14 टक्के इतका आहे.

एकाच वेळी 15 हजार रुग्णांवर उपचार शक्य

जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आजच्या घडीला 11 हजार सक्रिय रुग्ण आहेत. त्या दृष्टीने बेड, ऑक्सिजन व औषधी या याविषयीचे नियोजन सुरू आहे. यामध्ये बेडचा प्रश्न मार्गी लागला असून, एकाच वेळी 15 हजार रुग्णांवर उपचार करता येणे शक्य आहे. आता जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट काही प्रमाणात कमी झाला असला, तरी दुसऱ्या लाटेची तीव्रता आणि संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन या उपाययोजना कायम असतील, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.

गेल्या आठवडाभरातील रुग्णसंख्येची स्थिती अशी

  • 18 एप्रिल (बाधित रुग्ण 1 हजार 59, बरे झालेले रुग्ण 1 हजार 74)
  • 17 एप्रिल (बाधित रुग्ण 1 हजार 115, बरे झालेले रुग्ण 1 हजार 103)
  • 16 एप्रिल (बाधित रुग्ण 1 हजार 33, बरे झालेले रुग्ण 1 हजार 103)
  • 15 एप्रिल (बाधित रुग्ण 934, बरे झालेले रुग्ण 1 हजार 174)
  • 14 एप्रिल (बाधित रुग्ण 984, बरे झालेले रुग्ण 1 हजार 195)
  • 13 एप्रिल (बाधित रुग्ण 1 हजार 143, बरे झालेले रुग्ण 1 हजार 41)
  • 12 एप्रिल (बाधित रुग्ण 1 हजार 201, बरे झालेले रुग्ण 1 हजार 195)

हेही वाचा - गिरीश महाजन दाखवा; 10 लाख मिळवा, जामनेरात राष्ट्रवादीचे आंदोलन

हेही वाचा - जळगाव : कुसुंबा खूनप्रकरणात संशयाची सुई परिचितांकडेच!

Last Updated : Apr 25, 2021, 8:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.