ETV Bharat / state

जळगावात 'शॉर्टसर्किट'मुळे कंटेनरला आग

author img

By

Published : Nov 2, 2020, 9:11 PM IST

मुंबईतून जळगावात आलेल्या कंटेनरच्या कॅबिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने कॅबिनला आग लागली. यात कॅबिन पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

कंटेनर
कंटेनर

जळगाव - मुंबई येथून एका कंपनीचे लाखो रुपयांचे पावडर घेऊन जळगावात आलेल्या कंटेनरला सोमवारी (दि. 2 नोव्हेंबर) सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. चालकाच्या कॅबिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची माहिती मिळाली असून वेळीच अग्निशमन दलाचे बंब पोहोचल्याने आग आटोक्यात आली आहे. यात कंटनेरची कॅबिनपूर्णपणे जळून खाक झाली आहे

मुंबई येथील लावाशिवा येथून एका कंपनीचे लाखो रुपये किमतीचे पावडर घेवून कंटेनर (क्र. एम एच 46 एफ 8507) सोमवारी जळगावात पोहोचले. अजिंठा चौफुलीजवळ असलेल्या जळगाव पिपल्स बँकेच्या समोर चालकाने कंटेनर थांबविले. पाहणी केली असती, कॅबिनच्या खालच्या बाजूने ऑईलची गळती होत होती. याबाबत चालक गोविंद पाल याने कंटेनर मालकाला कळविले. थोड्यावेळाने कंटेनरच्या कॅबिनमधून धुर निघत होता, काही वेळाचे आगीत रुपांतर झाले.

माहिती मिळताच कंटेनर मालकाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन कार्यालयाला फोनवरुन घटना कळविली. त्यानुसार महापालिकेचा अग्निशमन बंब पोहोचला. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचार्‍यांनीही घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन कर्मचार्‍यांनी पाण्याचा मार करत आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत कंटेनरची कॅबीने पूर्णपणे खाक झाली आहे.

हेही वाचा - वर्षभरात मुख्यमंत्र्यांनी केले तरी काय; गिरीश महाजनांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.