मुंबई Devendra Fadnavis On Encounter : बदलापूर चिमुकल्यावर अत्याचार करणाऱ्या नराधम अक्षय शिंदे याचं पोलिसांनी सोमवारी सायंकाळी एन्काउंटर केलं. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर मोठा हल्लाबोल केला. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं रोखठोक उत्तर दिलं. "अक्षय शिंदे याला चौकशीसाठी नेताना त्यानं पोलिसांचं पिस्तूल हिसकावून त्यांच्यावर गोळीबार केला. यामुळे स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी अक्षय शिंदे याच्यावर गोळीबार केला. यात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. पोलिसांवर कोणी बंदूक उचलेल तर पोलीस काहीतरी करणारचं ना," असा रोखठोक सवाल यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना विचारला.
काय म्हणाले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस : ठाणे पोलिसांनी सोमवारी सायंकाळी बदलापूर अत्याचार प्रकरणातील नराधम अक्षय शिंदे याचा एन्काउंटर केला. यावर विरोधकांनी चांगलाच गदारोळ सुरू केला. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माध्यम प्रतिनिधींनी प्रतिक्रिया विचारली. यावेळी त्यांनी "आरोपी अक्षय शिंदे याच्या अगोदरच्या पत्नीनं पोलीस ठाण्यात अक्षय शिंदे याच्याविरोधात अनैसर्गिक अत्याचार प्रकरणी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात चौकशीसाठी अक्षय शिंदे याला चौकशीसाठी पोलीस नेत होते. यावेळी अक्षय शिंदे यानं सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या कमरेची पिस्तूल हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. त्यानं तीन राऊंड फायर केले. त्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय शिंदे याच्यावर गोळीबार केला. यात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. कोणीही पोलिसांवर बंदूक उचलेल, तर पोलीस काहीतर करतील ना," असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं.
बदलापूर प्रकरणातील नराधम अक्षय शिंदेचा एन्काउंटर : बदलापूर चिमुकल्यावर अत्याचार करणारा नराधम अक्षय शिंदे याच्यावर त्याच्या पहिल्या पत्नीनं अनैसर्गिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची चौकशी करण्यासाठी त्याला नेण्यात येत होतं. मात्र नेताना अक्षय शिंदे यानं सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या कमरेला असलेलं पिस्तूल हिसकावून तीन राऊंड फायर केल्याचा दावा पोलिसांनी केला. त्यामुळे बाजुला असलेले एन्काउंटर स्पेशालिस्ट संजय शिंदे यांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय शिंदे याच्यावर एक गोळी झाडली. त्यामुळे अक्षय शिंदे हा गंभीर जखमी झाला. त्यामुळे जखमी असलेले सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे आणि अक्षय शिंदे या दोघांना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं.
हेही वाचा :
- पहिल्या पत्नीवरील बलात्कार प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोपीला घेवून जात होते पोलीस अन् रंगला थरार - Accused Akshay Shinde Death
- बदलापूर एन्काऊंटर प्रकरणी विरोधक सरकारवर तुटून पडले; बनाव असल्याचा गंभीर आरोप - Badlapur Encounter Case
- बदलापूर अत्याचार प्रकरणातील नराधम एन्काउंटरमध्ये ठार; पोलिसांनी घातली गोळी अन् 'गेम फिनिश' - Badlapur Rape Accused Encounter