ETV Bharat / state

​​​​​​​जळगाव जिल्हा कॉफी टेबल बुकचे मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन - jalgaon book

जिल्ह्याच्या सचित्र माहितीचा समावेश असलेल्या जळगाव जिल्हा कॉफी टेबल बुकचे प्रकाशन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले.

कॉफी टेबल बुकचे प्रकाशन
author img

By

Published : Feb 23, 2019, 6:53 PM IST

जळगाव - जिल्ह्याच्या सचित्र माहितीचा समावेश असलेल्या जळगाव जिल्हा कॉफी टेबल बुकचे प्रकाशन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. याप्रसंगी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स व्यवसाय मंत्री महादेव जानकर, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजेनिंबाळकर उपस्थित होते.

जळगाव जिल्हा कॉफी टेबल बुकमध्ये जिल्ह्याची सर्वांगीण माहिती देणारे विविध ८ विभाग असून यामध्ये १७० विषयांची हाय रिझोल्युशनची रंगीत छायाचित्रे आणि महत्त्वपूर्ण माहिती आहे. या कॉफी टेबल बुकची संकल्पना माजी जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांची होती. त्यांच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती आधिकारी विलास बोडके यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या संपादकीय मंडळाने जवळपास वर्षभर परिश्रम घेऊन माहिती व छायाचित्रांचे संकलन, संपादन केले.

जळगाव जिल्ह्याचे सरकारी गॅझेटीयर यापूर्वी तीनवेळा (प्रथम आवृत्ती इंग्रजी १८८०, द्वितीय आवृत्ती इंग्रजी १९६२ आणि तिसरी आवृत्ती मराठी १९९४) प्रकाशित झाले आहे. यानंतर प्रथमच जळगाव जिल्ह्याची अद्ययावत माहिती व भरपूर रंगीत छायाचित्रे असलेले हे कॉफी टेबल बूक (आवृत्ती २०१९) तयार झाले आहे. यातील बहुतांश छायाचित्रे ही ड्रोनचा वापर करुन काढली असून ती आर्ट पेपरवर प्रसिद्ध करताना हाय रिझोल्युशनच्या कलर सेपरेशनचा वापर केला आहे.

undefined

या कॉफी टेबल बुकमध्ये जिल्ह्याच्या माहितीचे ८ विभाग आहेत.

१) या विभागात जिल्ह्याची भौगोलिक व ऐतिहासिक माहिती आहे. यात जळगाव शहर, जिल्हा व ऐतिहासिक स्थळांची माहिती आहे.

२) दुसरा विभाग धार्मिक, ऐतिहासिक स्मारके व पर्यटनस्थळे यांची माहिती देणारा आहे. यात लेण्या, किल्ले, मंदिरे, उत्खनन झालेली गावे आदींची माहिती आहे.

३) या विभागात नद्या, धरणे व उद्यानांची माहिती.

४) चौथ्या विभागात बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासह खासगी संस्था तथा व्यक्तिंनी जपलेल्या संग्रहालयांची माहिती आहे.

५) या विभागात जिल्ह्यातील औद्योगिक प्रकल्प व दळणवळणाची माहिती देण्यात आली आहे.

६) सहावा विभाग प्रशासन व शिक्षण विषयक सुविधांची माहिती देतो.

७) सातव्या विभागात जिल्ह्यातील यात्रा, उत्सव व संस्कृतीची तपशिलवार माहिती असून

८) आठव्या विभागात जिल्ह्यातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वे तथा संस्थांची माहिती देणारा आहे. यात ज्येष्ठ समाजसेवी साहित्यिक, लेखक, कवी, शाहिर यांच्यासह जिल्ह्यातील पद्मश्रींचा परिचय देण्यात आला आहे.

Intro:जळगाव
सचित्र छायाचित्रांसह जिल्ह्याच्या सर्वांगीण माहितीचा समावेश असलेल्या जळगाव जिल्हा काॅफी टेबल बुकचे प्रकाशन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. याप्रसंगी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स व्यवसाय मंत्री महादेव जानकर, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजेनिंबाळकर उपस्थित होते.Body:जळगाव जिल्हा काॅफी टेबल बुकमध्ये जिल्ह्याची सर्वांगीण माहिती देणारे विविध 8 विभाग असून यामध्ये १७० विषयांची हाय रिझोल्युशनची रंगीत छायाचित्रे आणि महत्त्वपूर्ण माहिती आहे. या कॉफी टेबल बुकची संकल्पना माजी जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांची होती. त्यांच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती आधिकारी विलास बोडके यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या संपादकीय मंडळाने जवळपास वर्षभर परिश्रम घेऊन माहिती व छायाचित्रांचे संकलन, संपादन केले आहे. जळगाव जिल्ह्याचे सरकारी गॅझेटीयर यापूर्वी तीनवेळा (प्रथम आवृत्ती इंग्रजी १८८०, द्वितीय आवृत्ती इंग्रजी १९६२ आणि तिसरी आवृत्ती मराठी १९९४) प्रकाशित झाले आहे. यानंतर प्रथमच जळगाव जिल्ह्याची अद्ययावत माहिती व भरपूर रंगीत छायाचित्रे असलेले हे कॉफी टेबल बूक (आवृत्ती २०१९) तयार झाले आहे. यातील बहुतांश छायाचित्रे ही ड्रोनचा वापर करुन काढली असून ती आर्ट पेपरवर प्रसिद्ध करताना हाय रिझोल्युशनच्या कलर सेपरेशनचा वापर केला आहे.Conclusion:जिल्ह्याच्या माहितीचे 8 विभाग-

या कॉफी टेबल बुकमध्ये जिल्ह्याच्या माहितीचे 8 विभाग आहेत. पहिल्या विभागात जिल्ह्याची भौगोलिक व ऐतिहासिक माहिती आहे. यात जळगाव शहर, जिल्हा व ऐतिहासिक स्थळांची माहिती आहे. दुसरा विभाग धार्मिक, ऐतिहासिक स्मारके व पर्यटनस्थळे यांची माहिती देणारा आहे. यात लेण्या, किल्ले, मंदिरे, उत्खनन झालेली गावे आदींची माहिती आहे. तिसऱ्या विभागात नद्या, धरणे व उद्यानांची माहिती असून चौथ्या विभागात बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासह खासगी संस्था तथा व्यक्तिंनी जपलेल्या संग्रहालयांची माहिती आहे. पाचव्या विभागात जिल्ह्यातील औद्योगिक प्रकल्प व दळणवळणाची माहिती असून सहावा विभाग प्रशासन व शिक्षण विषयक सुविधांची माहिती देतो. सातव्या विभागात जिल्ह्यातील यात्रा, उत्सव व संस्कृतीची तपशिलवार माहिती असून आठव्या विभागात जिल्ह्यातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वे तथा संस्थांची माहिती देणारा आहे. यात ज्येष्ठ समाजसेवी साहित्यिक, लेखक, कवी, शाहिर यांच्यासह जिल्ह्यातील पद्मश्रींचा परिचय देण्यात आला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.