ETV Bharat / state

जळगाव: शहरातील गटारींची स्वच्छता करा, अतिक्रमण तात्काळ हटवा; उपमहापौरांच्या सूचना - जळगाव महापालिका

'उपमहापौर आपल्या दारी' उपक्रमांतर्गत उपमहापौर सुनील खडके यांनी प्रभाग १६ मधील विविध परिसराला भेट देत नागरिकांशी चर्चा केली. नवलनगरकडे जाणाऱ्या झोपड्यांचे अतिक्रमण काढावे आणि नागरिकांची पर्यायी व्यवस्था करण्याची कार्यवाही करावी, असे उपमहापौर सुनील खडके यांनी सांगितले.

Clean the sewers in the city
जळगाव: शहरातील गटारींची स्वच्छता करा
author img

By

Published : Dec 16, 2020, 4:45 PM IST

Updated : Dec 16, 2020, 4:51 PM IST

जळगाव - जोशी कॉलनीतील सप्तश्रृंगी मंदिर ते मुकुंदनगर मुख्य गटार नळाला पाणी येते त्यादिवशी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावरून पाणी वाहते. त्यामुळे रस्त्याची वाट लागली आहे तर हेमू कलानी उद्यानाला लागून असलेली गटार साफ करण्यात येत नसल्याने पाणी वाहत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. उपमहापौर सुनील खडके यांनी लागलीच मुकादमला बोलावून त्याबाबत सूचना केल्या. तसेच नवलनगर अंध शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याचे देखील सांगितले.

'उपमहापौर आपल्या दारी' उपक्रमांतर्गत उपमहापौर सुनील खडके यांनी प्रभाग १६ मधील विविध परिसराला भेट देत नागरिकांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक मनोज आहुजा, रेश्मा काळे, मिनाक्षी पाटील, भरत सपकाळे, मनोज काळे, कुंदन काळे, अनिल जोशी, सुशील हासवानी आदींसह मनपा अधिकारी उपस्थित होते.

उपमहापौर सुनिल खडके शहरातील नागरी समस्यांची पाहणी करताना
अमृतच्या चाऱ्या लागलीच बुजवा, रस्त्यावर भर टाका -लक्ष्मीनगर आणि परिसरात अमृतच्या चाऱ्या खोदून १ वर्ष झाला तरीही बुजविण्यात आलेल्या नाहीत, अशी तक्रार नागरिकांनी केली असता उपमहापौर सुनील खडके यांनी अधिकाऱ्यांना सूचना देत नागरिकांचे नळ संयोजन लवकरात लवकर देऊन चाऱ्या बुजवाव्या असे सांगितले. तसेच जोशी कॉलनीच्या मुख्य रस्त्याला उतार झाला त्याठिकाणी भराव टाकून नव्याने रस्ता आणि बाजूची गटार बांधणेबाबत कार्यवाही करावी, असे उपमहापौरांनी सांगितले.झोपड्यांचे अतिक्रमण काढा, गटारींचे काम करा-नवलनगरकडे जाणाऱ्या झोपड्यांचे अतिक्रमण काढावे आणि नागरिकांची पर्यायी व्यवस्था करण्याची कार्यवाही करावी, असे उपमहापौर सुनील खडके यांनी सांगितले. श्री गुरू गोरक्षनाथ मंदिर समोरील गटारीवर कल्व्हर्ट बसविल्यास मोठी समस्या दूर होईल असे नागरिकांनी सांगितले असता त्याबाबत देखील उपमहापौरांनी सूचना केल्या.रस्त्यांची डागडुजी करावी-लक्ष्मीनगरातील नाला पुढे अरुंद असल्याने पाणी वाहण्यास अडचण येते अशी बाब नगरसेवकांनी मांडली असता नाल्याची पुढील दिशा आणि विकास प्लॅनबाबत दोन दिवसात माहिती सादर करावी, अशा सूचना उपमहापौर सुनील खडके यांनी दिल्या. तसेच सम्राट कॉलनीत रस्ते खराब झाले असून एलईडी लाईट नसल्याची समस्या नागरिकांनी सांगितली. रस्त्यांची तात्काळ डागडुजी करावी अशा सूचना उपमहापौरांनी दिल्या.

टीएम नगरातील उद्यान नागरिकांना खुले करा -

टीएमनगर समोरील मोकळ्या जागेवर उद्यान विकसित करण्यात येत आहे. सध्या उद्यान अर्धवट विकसित केलेले असून लोखंडी गेटला कुलूप लावण्यात आलेले आहे. उद्यान नागरिकांसाठी विकसित करून खुले करावे अशा सूचना उपमहापौर सुनील खडके यांनी दिल्या.

Last Updated : Dec 16, 2020, 4:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.