ETV Bharat / state

जळगावमध्ये पोलिसांच्या वाहनावर जमावाची तुफान दगडफेक, पोलिसांकडून लाठीहल्ला

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील कैलास चंद्रकांत सपकाळे (वय 16) या अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या शुक्रवारी झाली होती. या हत्येप्रकरणी एका संशयित आरोपीला आज अटक करण्यात आली. संशयिताला पोलीस 2 वाहनांमधून जळगावला घेऊन जात होते. त्यावेळी त्यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली.

Citizens attack on police in Jalgaon
पोलिसांच्या वाहनांवर जमावाची दगडफेक
author img

By

Published : Apr 4, 2020, 12:48 PM IST

जळगाव - खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीला घेऊन जाणाऱ्या जळगाव पोलिसांच्या 2 वाहनांवर संतप्त जमावाने तुफान दगडफेक करत हल्ला केला. ही घटना आज दुपारी साडेअकराच्या सुमारास जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावाजवळ घडली. या घटनेत पोलिसांच्या वाहनांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, वेळीच वाहने मार्गस्थ केल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना दुखापत झाली नाही. हा हल्ला यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील ग्रामस्थांनी केल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांच्या वाहनांवर जमावाची दगडफेक

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील कैलास चंद्रकांत सपकाळे (वय 16) या अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या झाल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली होती. या हत्येप्रकरणी जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका संशयित आरोपीला आज अटक केली. त्या संशयिताला पोलीस 2 वाहनांमधून जळगावला घेऊन जात होते. ही माहिती डांभुर्णी येथील ग्रामस्थांना होताच, सुमारे 20 ते 25 जणांच्या समूहाने दुचाकींवरून पोलिसांच्या वाहनांचा पाठलाग सुरू केला. जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावाजवळ जमावाने पोलिसांची वाहने अडवली. अल्पवयीन मुलाची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपीला आमच्या स्वाधीन करा, अशी मागणी जमाव करत होता. परंतु, आरोपीच्या जीवितास धोका नको, म्हणून पोलिसांनी नकार दिला. पाहता पाहता जमाव आक्रमक झाला. म्हणून पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.

पोलिसांनी लाठीमार सुरू केल्याने जमाव अनियंत्रित झाला. पोलीस वाहने घेऊन जात असल्याचे पाहून जमावाने वाहनांवर तुफान दगडफेक सुरू केली. या प्रकारामुळे ममुराबाद गावातील ग्रामस्थ देखील घाबरले होते. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून हल्लेखोरांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.