ETV Bharat / state

पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर जळगावात आनंदोत्सव

भारतीय हवाई दलाने एलओसी ओलांडून पाकिस्तानातील बालाकोटवर एअर स्ट्राईक करत अनेक दहशतवादी तळ उदध्वस्त केले. यानिमित्त जळगावात श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Jalgaon
author img

By

Published : Feb 26, 2019, 3:28 PM IST

जळगाव - भारतीय हवाई दलाने एलओसी ओलांडून पाकिस्तानातील बालाकोटवर एअर स्ट्राईक करत अनेक दहशतवादी तळ उदध्वस्त केले. यानिमित्त जळगावात श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शहरातील टॉवर चौकात नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन फटाक्यांची आतषबाजी करत तसेच एकमेकांना पेढे व मिठाईचे वाटप करून आनंद व्यक्त केला. यावेळी वंदे मातरम, भारत माता की जय, अशा घोषणा देण्यात आल्या.

जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भारतीय जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात ४९ जवानांना वीरमरण आले होते. त्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. या हल्ल्याचा बदला घ्यावा, अशी मागणी होत असताना भारतीय सैन्य दलाच्या मिराज विमानांनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास पाकिस्तानातील दहशतवादी ३ तळे उदध्वस्त केली आहेत.

पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर जळगावात आनंदोत्सव

पुलवामा घटनेचा जोरदार बदला घेतल्याने फटाक्यांची आतषबाजी, पेढे वाटून तसेच ढोल व ताशांचा गजर करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी नागरिकांनी भारतीय तिरंगा हवेत फडकावून भारतीय सैन्य दलाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. टॉवर चौकासह कोर्ट चौक, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूल परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Intro:जळगाव
भारतीय सैन्य दलाच्या विमानांनी एलओसी ओलांडून पाकिस्तानातील बालाकोटवर एअर स्ट्राईक करत अनेक दहशतवादी तळ उदध्वस्त केल्याने जळगावात श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शहरातील टॉवर चौकात नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन फटाक्यांची आतषबाजी करत तसेच एकमेकांना पेढे व मिठाईचे वाटप करून आनंद व्यक्त केला.Body:जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे पाकिस्तानातील जैश-ए-मोहंमद या दहशतवादी संघटनेने भारतीय जवानांच्या ताफ्यावर भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात 44 जवान शहीद झाले होते. त्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. या हल्ल्याचा बदला घ्यावा, अशी मागणी होत असताना भारतीय सैन्य दलाच्या मिराज विमानांनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास एलओसी ओलांडून पाकिस्तानातील बालाकोटवर एअर स्ट्राईक करत अनेक दहशतवादी तळ उदध्वस्त केली. पुलवामा घटनेचा जोरदार बदला घेतल्याने जळगावात फटाक्यांची आतषबाजी, पेढे वाटून तसेच ढोल व ताशांचा गजर करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी नागरिकांनी भारतीय तिरंगा हवेत फडकावून भारतीय सैन्य दलाप्रति कृतज्ञता व्यक्त केली.Conclusion:शहरात ठिकठिकाणी आनंदोत्सव-

भारतीय सैन्य दलाच्या विमानांनी पाकिस्तानातील बालाकोटवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर जळगावात ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. टॉवर चौकासह कोर्ट चौक, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 'वंदे मातरम', 'भारत माता की जय', अशा घोषणा देण्यात आल्या.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.