ETV Bharat / state

पीक कर्ज मंजुरीसाठी लाच घेणे भोवले; बँक मॅनेजरसह दोघे 'सीबीआय'च्या जाळ्यात

author img

By

Published : Sep 4, 2020, 12:51 PM IST

बँक व्यवस्थापक किरण ठाकरे आणि त्याचा खासगी पंटर नरेंद्र पाटील अशी संशयित आरोपींविरुद्ध शेतकऱ्याकडून 75 हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी पुणे सीबीआयमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईदरम्यान, बँक व्यवस्थापकाच्या घरातून तब्बल 10 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे बँकांमध्ये पीक कर्ज मंजुरीसाठी शेतकऱ्यांची होणारी लूटदेखील या माध्यमातून उघड झाली आहे.

cbi arrested two officer including bank manager
पीक कर्ज मंजुरीसाठी लाच घेणे भोवले : बँक मॅनेजरसह दोघे पुणे 'सीबीआय'च्या जाळ्यात

जळगाव - पीक कर्ज मंजूर करण्याच्या मोबदल्यात शेतकऱ्याकडून 75 हजार रुपयांची लाच घेणे पारोळा शहरातील बँक ऑफ बडोदा शाखेच्या व्यवस्थापकासह खाजगी पंटरला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी सीबीआयच्या पुण्यातील पथकाने या दोघांना अटक केली आहे. बँक व्यवस्थापक किरण ठाकरे आणि त्याचा खासगी पंटर नरेंद्र पाटील अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

या दोघांविरुद्ध पुणे सीबीआयमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईदरम्यान, बँक व्यवस्थापकाच्या घरातून तब्बल 10 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे बँकांमध्ये पीक कर्ज मंजुरीसाठी शेतकऱ्यांची होणारी लूटदेखील या माध्यमातून उघड झाली आहे.

याबद्दल सविस्तर माहीती अशी की, पारोळा तालुक्यातील एका शेतकऱ्याने या लाच प्रकरणाबाबत पुणे सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. या शेतकऱ्याने पीक कर्जासाठी पारोळा शहरातील बँक ऑफ बडोदा शाखेत चार प्रकरणे दाखल केलेली होती. ही प्रकरणे मंजूर करण्याच्या मोबदल्यात बँक व्यवस्थापक किरण ठाकरे याने 8 टक्क्यांप्रमाणे लाच मागितली होती. तर खासगी पंटर नरेंद्र पाटीलने पीक कर्जाचे प्रकरण मंजूर करून आणण्यासाठी 25 हजारांची लाच मागितली होती.

धनादेशाच्या माध्यमातून स्वीकारली लाचेची रक्कम -

दरम्यान, शेतकर्‍याला बँकेकडून 7 लाख 10 हजार रुपयांचे पीक कर्ज मंजूर झाले. त्यानंतर ठरलेल्या टक्केवारीप्रमाणे शेतकरी बुधवारी लाचेची रक्कम देण्यासाठी बँकेत गेला. मात्र, संशयित आरोपींनी रोकड स्वरुपात लाच स्वीकारली नाही. त्यांनी शेतकर्‍याकडून धनादेश घेतला. हा धनादेश त्यांनी गुरुवारी वटवला. त्यातील 25 हजार पंटरने तर 50 हजारांची रक्कम व्यवस्थापकाने ठेवून घेतली. शेतकऱ्याने केलेल्या तक्रारीवरुन पुणे सीबीआयच्या पथकाने त्याच्या लाचेच्या तक्रारीची बुधवारी पडताळणी केली. या तपासात त्या दोघांनी लाच घेतल्याचे निष्पन्न झाल्याने सीबीआयने संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करुन गुरुवारी त्यांना अटक करण्यात आली. पुणे सीबीआयचे पोलीस निरीक्षक आनंद रुहिकर यांनी या कारवाईला दुजोरा दिला.

जळगाव पोलीस या कारवाईविषयी अनभिज्ञ -

दरम्यान, या लाच प्रकरणात पुण्याच्या सीबीआयच्या पथकाने जळगावात येऊन कारवाई केली. मात्र, या कारवाईविषयी जळगाव पोलीस अनभिज्ञ होते. या कारवाई संदर्भात जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारचे नियंत्रण असणाऱ्या एखाद्या विभागातील अधिकाऱ्याविरुद्ध थेट कारवाई करण्याचे अधिकार सीबीआयला आहेत. बँक ऑफ बडोदा ही राष्ट्रीयीकृत बँक असल्याने आलेल्या तक्रारीनुसार सीबीआयने कारवाई केली असावी, अशी माहिती डॉ. पंजाबराव उगले यांनी 'ई- टीव्ही भारत'शी बोलताना दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.