ETV Bharat / state

जळगावात धावत्या कारमध्ये चालकास हृदयविकराचा झटका; चार वाहनांना धडक

author img

By

Published : Oct 15, 2020, 7:25 PM IST

जळगावमध्ये धावत्या कारमध्ये चालकास हृदयविकाराचा झटका आल्याने अपघात घडला यात चार जण जखमी झाले आहे. अत्यवस्थ असलेल्या या कारचालकास रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या अपघातातील जखमी व हृदय विकाराचा झटका आलेल्या कारचालकाचे नाव निष्पन्न झाले नव्हते.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव - धावत्या कारमध्ये चालकास हृदयविकाराचा झटका आल्याने कारने समोर चालत असलेले दोन पादचारी, एक दुचाकीस्वार व एका कारला पाठीमागून धडक दिल्याची घटना गुरुवारी (दि. 15 ऑक्टोबर) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कुसुंबा गावाजवळील महामार्गावर घडली आहे. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत.

औरंगाबादकडून जळगावकडे येणाऱ्या कारमधील (एमएच 12 क्युएफ 1252) चालकास हृदयविकाराचा झटका आला. यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अत्यवस्थ झालेल्या या चालकाने समोर चालत असलेल्या दोन पादचाऱ्यांसह दुचाकीस जोरदार धडक दिली. यात तीघे जखमी झाले. यानंतरही कार पुढे चालत राहिली. अखेर समोर चालत असलेल्या (एमएच 14 डीएन 9843) या कारला मागून धडक दिल्यामुळे ही कार थांबली. त्या कारमधीलही एकजण जखमी झाला आहे.

या अपघातामुळे रस्त्यावरील नागरिक कारचालकावर प्रचंड संतापले. त्याची कार थांबताच जमावाने हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, याचवेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या भरत सुतार यांनी देखील कारचालकाकडे धाव घेतली. या कारचालकास हृदयविकाराचा झटका आलेला असल्याने त्याच्याकडून हा अपघात घडल्याचे सुतार यांनी ओळखले. यांनतर सुतार यांनी संतप्त जमावाची समजूत काढली. अत्यवस्थ असलेल्या या कारचालकास रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या अपघातातील जखमी व हृदय विकाराचा झटका आलेल्या कारचालकाचे नाव निष्पन्न झाले नव्हते.

हेही वाचा - जिल्हा कोव्हिड रुग्णालय सर्व रुग्णांसाठी होणार खुले? आरोग्य यंत्रणेकडून चाचपणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.