ETV Bharat / state

भाजपाने अगोदर त्यांचे आमदार सांभाळावेत; गुलाबराव पाटलांचा हल्लाबोल

author img

By

Published : Aug 15, 2020, 3:46 PM IST

स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय ध्वजारोहण कार्यक्रम आटोपल्यानंतर अजिंठा विश्रामगृहात गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी गुलाबराव पाटलांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, भाजपाकडून महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याची सुरू असलेली चर्चा, राज्य सरकारकडून होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, अशा विविध विषयांवर मते मांडली.

Gulabrao Patil
गुलाबराव पाटील

जळगाव - महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार, अशी आवई(अफवा) गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षात असलेल्या भाजपाकडून उठवली जात आहे. त्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. आमचे सरकार स्थापन झाले, तेव्हापासून भाजपाकडून सरकार पडणार, असा दावा केला जात आहे. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार पाडणे म्हणजे भाजपाचे 'मुंगेरीलाल के हसीन सपने' आहेत. आपले आमदार शाबूत ठेवण्यासाठी भाजपकडून हा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. आमचे सरकार कोसळणार नाहीच, उलट भाजपाने त्यांचे आमदार सांभाळावेत नाही तर ते आमच्याकडे येतील, अशा शब्दात शिवसेनेचे उपनेते व राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपावर हल्लाबोल केला

स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय ध्वजारोहण कार्यक्रम आटोपल्यानंतर अजिंठा विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटलांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, भाजपाकडून महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याची सुरू असलेली चर्चा, राज्य सरकारकडून होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, अशा विविध विषयांवर मते मांडली.

भाजपाच्या सरकार कोसळणार असल्याच्या दाव्याचा त्यांनी आपल्या खास शैलीत जोरदार समाचार घेतला. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार पडणार, असा दावा भाजपाकडून कितीही सुरू असला तरी त्याला काहीही अर्थ नाही. सरकार स्थापन झाल्यापासून भाजपा हा दावा करत आहे. राजस्थानचे सरकार आम्ही पाडू, असाही भाजपाचा दावा होता. मात्र, राजस्थानच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. राजस्थानचे बहुमत पाहिले तर ते अवघे 10 ते 20 मतांचे आहे. आपल्याकडे सध्या 170 आमदार एकत्र आहेत. म्हणजेच सरकार पडणार हे भाजपाचे 'मुंगेरीलाल के हसीन सपने'च आहेत, असे पाटील म्हणाले.

अधिकाऱ्यांच्या बदल्या ही नियमित प्रक्रिया -

राज्य सरकारकडून अधिकाऱ्यांच्या बदली प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप भाजपा करत आहे. यालाही गुलाबराव पाटलांनी स्पष्टीकरण दिले. अधिकाऱ्यांच्या बदल्या ही नियमित प्रक्रिया आहे, त्यात गैर काहीही नाही. आमच्या अगोदर पाच वर्षे भाजपाचेच सरकार होते. त्यावेळीही आम्ही त्यांच्या सोबत होतो. तेव्हाही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. तेव्हा तर एकाच महिन्यात दोन-दोन, तीन-तीन बदल्या झालेली उदाहरणे आहेत. जर बदल्यांची चौकशी करायची असेल तर मग गेल्या 6 वर्षात झालेल्या सर्व बदल्यांची व्हायला हवी. त्यात किती गैरप्रकार झाले आहेत, ते लक्षात येईलच? चंद्रकांत पाटील हे माझ्यापेक्षा ज्येष्ठ मंत्री होते. त्यांनी केलेला हा आरोप म्हणजे सरकारला तसेच मंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची टीका गुलाबराव पाटील यांनी केली.

शरद पवार हे सर्वेसर्वा -

पार्थ पवार यांच्या विषयावरून नाहक राजकारण सुरू आहे. शेवटी शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आहेत. शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात राजकारणाच्या पलीकडे नाते आहे. आजोबा म्हणून पार्थ यांचा कान पकडण्याचाही त्यांना अधिकार आहे. त्यामुळे या विषयावर होणारी टीका चुकीची आहे. आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत देखील त्यांना मंत्रीपद दिले म्हणून टीका सुरू आहे. आता देवेंद्र फडणवीस यांना भाजपाने बिहारची जबाबदारी दिली म्हणून आम्ही काय त्यांना 'ही' जबाबदारी का दिली, असे म्हणतोय का? ज्या व्यक्तीमध्ये जी क्षमता असते, त्यानुसार पक्ष जबाबदारी देत असतो. मात्र, आदित्य ठाकरे हे फक्त ठाकरे असल्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.