जळगाव: दिवाळीनिमित्त सोन्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात फुलली आहे. कोरोना काळानंतर यंदा दिवाळी सर्वजण मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात साजरी करत आहे. यातच दिवाळी सणानिमित्त महालक्ष्मी पूजनाला अनेक ग्राहक आपल्या घरात सोने खरेदी करत असतात. या स्पर्शभूमीवर आज जळगावतील सराफ बाजारात सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी पहावयास मिळाली. सोनं खरेदी करण्यासाठी जळगाव सुवर्णनगरीमध्ये ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे. आज सोन्याचा भाव 50 हजार 300 रूपये तर चांदीचा भाव 57 हजार 900 रूपये आहे.
ग्राहकांचा उत्साह पाहायला मिळत आहे यातच सोन्याचा भावात 100 रूपये घसरण झाली आहे. तर चांदीचा भावात 600 रुपये वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्ष कोरोना प्रादुर्भावामुळे ग्राहकांना सोनं खरेदी करता आली नाही. मात्र यावर्षी निर्बंध शिथिल झाल्याने सोनं खरेदी करण्यासाठी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांचा उत्साह पाहायला मिळत आहे. कसदार सोनं म्हणून ओळख असलेल्या जळगाव सुवर्णनगरी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोना खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
सोन्याच्या भावात काही प्रमाणात घट पारंपारिक सोन्याचे दागिने यात पेशवाई, कंठी हार, मंगळसूत्र, कानातले यासह विदेशी दागिन्यांची व्हरायटी देखील उपलब्ध असल्याने महिला वर्गांमध्ये सोने खरेदी करण्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. गेल्या 2 वर्ष कोविडचे नियम होते. मात्र या वर्षी नियम कमी झाल्याने यावर्षी सोन्याच्या भावात काही प्रमाणात घट झाल्याने याचा देखील ग्राहकांना दिलासा मिळाल्याने सोने खरेदी करण्यासाठी आज जळगाव सुवर्णनगरी ग्राहकांनी फुलली आहे.