जळगाव - जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे घडलेल्या चार भावंडांच्या हत्याकांडाची केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेतली आहे. अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंत असलेल्या या हत्याकांडाचा तपास जळगाव पोलीस दलाने अतिशय नियोजनबद्ध व शास्त्रोक्त रितीने करत आरोपी निष्पन्न केले होते. याच तपासाची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना व्हावी, या उद्देशाने केंद्रीय गृहमंत्रालयाने या हत्याकांडाची अभ्यासासाठी निवड केली. दरम्यान, या हत्याकांडाचे प्रेझेंटेशन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडेंनी केले. यामुळे जळगाव पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
बोरखेडा हत्याकांडाची केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अभ्यासासाठी निवड - ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभाग
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे घडलेल्या चार भावंडांच्या हत्याकांडाची केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेतली आहे.