ETV Bharat / state

भाजपचा एकनाथ खडसेंना ठेंगा, मात्र मुलगी रोहिणी खडसेला मिळणार उमेदवारी..?

author img

By

Published : Oct 3, 2019, 2:19 PM IST

माजी मंत्री आणि राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पक्षाकडून विधानसभा निवडणुकीत डच्चू मिळण्याची शक्यता आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीतही खडसेंचे नाव नसल्याने, खडसेंचे तिकीट त्यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर

जळगाव - भाजपचे माजी मंत्री आणि राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पक्षाकडून विधानसभा निवडणुकीत डच्चू मिळण्याची मोठी शक्यता आहे. पण खडसेंना थेट न डावलता त्यांना काहीसे पेचात पकडण्याचा प्रयत्न पक्षातून करण्यात येत आहे. कारण खडसेंना एकीकडे ठेंगा दाखवला तरी, दुसरीकडे त्यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांना पक्षाकडून तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

eknath khadase nad rohini khadase

कोण आहेत रोहिणी खडसे-खेवलकर?

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या रोहिणी खडसे-खेवलकर या कन्या आहेत. वकील असलेल्या रोहिणी यांनी एलएल.एम पर्यंत शिक्षण घेतले आहे. भविष्यात न्यायाधीश किंवा प्राध्यापक व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, घरातील राजकीय वातावरणाने त्यांचा या क्षेत्राकडे ओढा वाढला.

हेही वाचा... भाजपमध्ये बंडखोरी? यादीत नाव नसतानाही एकनाथ खडसेंचा उमेदवारी अर्ज दाखल

घरात वडील एकनाथ खडसे हे राजकारणात असल्याने आणि राज्याचे मंत्री असल्यापासून त्यांच्यावर राजकारणाचे संस्कार झाले असल्याचे, रोहिणी सतत सांगतात. तसेच भविष्यात निवडणूक लढविण्याची जबाबदारी दिल्यास आपल्याला नक्की आवडेल, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. रोहिणी यांच्या कामात अत्यंत साधेपणा आहे, असे त्यांच्या सोबत असणारे त्यांचे सहकारी सांगतात. तसेच त्या सर्वांशी आत्मीयतेने बोलत काम करून घेतात, असेही सांगितले जाते.

राजकीय क्षेत्रातील कार्य

रोहिणी यांचे स्थानिक ठिकाणच्या सहकार क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे. आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणी या सहाकारी संस्थेच्या त्या अध्यक्षा आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग सहकारी महासंघाच्याही त्या पदाधिकारी राहिलेल्या आहे. एकनाथ खडसे यांचाही त्यांच्या कामावर व वैयक्तीक क्षमतांवर विश्वास आहे, यामुळेच जर रोहिणी यांना उमेदवारी दिली तर खडसे यांच्यावर दुहेरी दडपण असणारे आहे.

rohini khadse daughter of eknath khadse
रोहिणी खडसे-खेवलकर

हेही वाचा... भाजपच्या पक्षांतर्गत खेळीमुळे वाढली एकनाथ खडसेंची अस्वस्थता​​​​​​​

अ‌ॅडव्होकेट असलेल्या रोहिणी खडसे खेवलकर या सध्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा आहेत. या बँकेच्या 100 वर्षांच्या इतिहासात रोहिणी या पहिल्याच महिला अध्यक्ष ठरल्या आहेत. तसेच वडिलांसोबत सामाजिक कार्यात सक्रीय असल्याने त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे.

गरीब आणि गरजू लोकांसाठी रोहिणी या सातत्याने काम करत असतात, यातूनच मतदारसंघातील जनतेच्या मनात त्यांच्या बद्दल एक विश्वासाचा चेहरा अशी प्रतिमा आहे. तसेच एकनाथ खडसे यांच्या कार्यकर्त्यांनाही रोहिणी यांच्या नेतृत्वाबद्दल विश्वास आहे. यामुळे रोहिणी यांना जर भाजपकडून उमेदवारी देण्यात आली तर, एकनाथ खडसेंसाठी तो मोठा पेचाच प्रसंग असणार आहे.

हेही वाचा... मुक्ताईनगर विधानसभा : एकनाथ खडसेंच्या उमेदवारीविषयी संभ्रम; सेना जागेसाठी आग्रही​​​​​​​

Intro:Body:

अखेर नितेश राणेंच्या हाती 'कमळ', जिल्हाध्यक्षांच्या हस्ते पक्षप्रवेश

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.