ETV Bharat / state

जळगाव मतदारसंघासाठी भाजपला उमेदवार मिळेना; रावेरमध्ये खडसेंच्या भूमिकेकडे लक्ष - खडसे

जळगावमधून सलग १० वर्षे खासदार असणारे ए.टी. पाटील यावेळी भाजपची पसंती नाहीत. त्यांना पक्षातूनच विरोध होत आहे. त्यामुळे नवा उमेदवार शोधण्याची पाळी भाजपवर आली आहे.

एकनाथ खडसे
author img

By

Published : Mar 11, 2019, 12:28 PM IST

जळगाव - देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. पण, अजूनही जळगाव मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाला योग्य उमेदवार मिळत नाही. काँग्रेसने माजी मंत्री गुलाबराव देवकरांना उमेदवारी दिली आहेत. पण, भाजप अद्याप सक्षम पर्याय देऊ शकले नाही. दुसरीकडे रावेरमध्ये एकनाथ खडसेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जळगावमधून सलग १० वर्षे खासदार असणारे ए.टी. पाटील यावेळी भाजपची पसंती नाहीत. त्यांना पक्षातूनच विरोध होत आहे. त्यामुळे नवा उमेदवार शोधण्याची पाळी भाजपवर आली आहे. अशातच काँग्रेसने उमेदवार जाहीर करुन पहिला डाव खेळला आहे. भाजपकडून नावांची चाचपणी सुरु आहे. अभियंता प्रकाश पाटील, जिल्हा परिषद सदस्या स्मिता वाघ आणि गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजन यांची नावे चर्चेत आहेत. यातील प्रकाश पाटील यांना पक्षाकडून निरोप गेल्याचेही सांगण्यात येत आहे. पण, अजून कुठल्याही नावावर शिक्कामोर्तब झाले नाही.

जळगाव मतदारसंघामध्ये शिवसेनेची चांगली ताकद आहे. त्यामुळे शिवसेनेने जळगाव मतदारसंघाची मागणी केली होती. त्या दृष्टीने त्यांनी तयारी देखील सुरू केली होती. पण, ऐनवेळी युतीची घोषणा झाली. त्यामुळे शिवसेनेच्या मनसुब्यावर पाणी फिरले आहे. शिवसेना बंड करेल असे दिसत होते. पण, आता शिवसेनेच्या गोटात शांतता आहे. त्यामुळे त्यांनी युतीचा कौल स्वीकारल्याचे दिसत आहे.

दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे. रावेर मतदारसंघातून खडसेंच्या सून रक्ष खडसे खासदार आहेत. खडसे आणि भाजपच्या नेत्यांमध्ये सतत कुरबुरी सुरु असतात. त्यामुळे भाजप खडसेंना पुन्हा संधी देईल का याबद्दल शंका होती. पण, मुख्यमंत्री नुकतेच भुसावळला जाऊन आले त्यामुळे खडसेंच्या उमेदवारीबाबत आशा पल्लवीत झाल्या आहेत. तसेच, भाजपलाही खडसेंशिवाय पर्याय नसल्याचे बोलले जात आहे. तरीही रावेरमधून अजूनही भाजपने उमेदवारी घोषीत केली नाही.

Intro:(कृपया स्पेशल पॅकेज स्टोरी करावी, ग्राफिक्स वापरून)

जळगाव
शिवसेना-भाजपमध्ये युती झाली असली तरी जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार ए. टी. पाटील यांची उमेदवारी धोक्यात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या सक्षम उमेदवारापुढे आपला उमेदवार शोधतांना सध्या सत्ताधारी भाजपला चांगलाच घाम फुटला आहे. भाजपच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर करून लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आघाडी घेतल्याचे चित्र जळगाव लोकसभा मतदारसंघात दिसून येत असून राष्ट्रवादीने आपली तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे रावेर लोकसभेत माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या भूमिकेवर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. या मतदारसंघात आघाडीचेही तळ्यातमळ्यात सुरू आहे.

Body:गेल्या दोन पंचवार्षिकपासून लोकसभा निवडणुकीत भाजपचे प्रतिनिधित्व करणारे खासदार ए.टी. पाटील यांची उमेदवारी धोक्यात आणण्याचा प्रयत्न भाजप मधीलच काहींनी केला आहे. यामुळे पाटलांचा उमेदवारीचा पत्ता कापला जाण्याची शक्यता असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी थेट संपर्क करून जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारीची माळ माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या गळ्यात टाकली आहे. यामुळे जळगाव ग्रामीण विधानसभेसाठी गेल्या काही दिवसांपासून तयारीला लागलेले गुलाबराव देवकर यांना नाही म्हणता म्हणता अखेर शरद पवार यांच्या आदेशाने लोकसभेची उमेदवारी स्वीकारावी लागली आहे. विशेष म्हणजे, उमेदवारीचा स्वीकार केल्यानंतर देवकर लगेच दुसऱ्या दिवसापासून कामाला लागले आहेत. त्यांनी मतदारसंघात मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचे कार्यक्रम सुरू केले आहेत.

भाजपकडून नव्या उमेदवाराचा शोध-

राष्ट्रवादी काँग्रेसने गुलाबराव देवकर यांना उमेदवारी देताच भाजपकडून नव्या उमेदवाराचा शोध सुरू झाला आहे. देवकर यांच्यासमोर तग धरू शकेल, अशा उमेदवाराचा भाजपकडून शोध सुरू आहे. देवकर यांच्यासमोर विद्यमान खासदार ए. टी. पाटील हे मातब्बर प्रतिस्पर्धी ठरू शकतील. मात्र, ए. टी. पाटील यांचा पत्ता कसा कापला जाईल, याची उत्तम आखणी भाजपमधीलच काहींनी केली आहे. त्यामुळे भाजप आता नवीन पर्यायांच्या शोधात दिसत आहे. सध्या भाजपकडे तीन पर्याय आहेत. त्यात अभियंता प्रकाश पाटील, विधान परिषद सदस्य स्मिता वाघ तसेच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांचा त्यात समावेश आहे. प्रसंगी अन्य पक्षातून एखादा मातब्बर उमेदवार भाजपकडून आयात केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, राज्यात साडेतीनशे सिंचन प्रकल्पांचा आराखडा तयार करणारे तसेच समाजकारणाचा वारसा असलेले अभियंता प्रकाश पाटील हे भाजपच्या निरोपाने कामाला लागले आहेत. मात्र, भाजपची उमेदवारी अजून अंतिम झालेली नाही.

विद्यमान खासदारांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता-

काही महिन्यांपूर्वी झालेल्या सर्वेक्षणात जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा भाजप जिंकण्यात यशस्वी ठरणार असल्याचे दाखवले गेले होते. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर आता विद्यमान खासदारांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता असल्याने भाजपपुढे राष्ट्रवादी काँग्रेसला पर्याय ठरू शकेल; असा सक्षम उमेदवार शोधण्याचे आव्हान उभे राहिले आहे. भाजप कुणाला गळाला लावते की पक्षातीलच एखाद्या नव्या उमेदवाराला संधी देते? याकडे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सेनेचे कार्यकर्ते नाराज-

राज्यात सत्तेत असताना देखील भाजपकडून सेनेला वेळोवेळी हीन वागणूक मिळाली. त्यामुळे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये भाजपविषयी नाराजीचे वातावरण होते. युतीचा निर्णय अधांतरी असताना सेनेने जळगाव लोकसभा मतदारसंघात जोरदार पूर्वतयारी सुरू करत माजी आमदार आर. ओ. पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु आता वरिष्ठांनी युतीची घोषणा केल्याने ही जागा भाजपच्या वाट्याला जाणार आहे. त्यामुळे शिवसैनिक नाराज झाले आहेत. या मतदारसंघात सेनेचे प्राबल्य लक्षात घेऊन ही जागा सेनेला सोडावी, अशी मागणी शिवसैनिकांनी लावून धरली आहे.

Conclusion:रावेरात अद्यापही शांतताच-

रावेर लोकसभा मतदारसंघात अद्यापही शांतता दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. परंतु, येथे लढतीचे चित्र स्पष्ट नाही. कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने उमेदवारीची घोषणा केलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच भुसावळ दौरा केला. त्यामुळे विद्यमान खासदार रक्षा खडसे यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, असे असताना माजीमंत्री खडसे यांनी पुन्हा सरकारविरोधात गरळ ओकून खळबळ उडवून दिली. आगामी काळात खडसे काय भूमिका घेतात, यावर रावेर मतदारसंघाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडीची घोषणा झाली असली तरी रावेरच्या जागेवर काँग्रेस दावा करत आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे चांगले वर्चस्व असल्याने राष्ट्रवादीने हा मतदारसंघ सोडावा, अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.