ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात बंडखोरीमुळे युतीत मतभेद - jalgaon election news

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या बंडखोरीमुळे सेनेच्या उमेदवारांना फटका बसून निकालाची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. युतीतील बंडखोरी हा विषय सध्या जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे.

bjp shivsena alliance politics in jalgaon
author img

By

Published : Oct 14, 2019, 8:24 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील ११ पैकी ४ मतदारसंघात भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे सेनेच्या अडचणी वाढल्याने सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटलांचा पंतप्रधान मोदींच्या सभेपूर्वीच संताप झाला. भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या बंडखोरांना शांत करून युतीधर्म पाळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गुलाबराव पाटलांच्या संतापाचा उद्रेक झाल्याने सेनेच्या वाट्याला असलेल्या जळगाव ग्रामीण, चोपडा, एरंडोल आणि पाचोरा या मतदारसंघातील बंडखोरीचा मुद्दा तर ऐरणीवर आलाच आहे. शिवाय भाजप आणि सेनेत खरंच युती आहे का? असा प्रश्नही निर्माण झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात विधानसभेचे ११ मतदारसंघ आहेत. युतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यात ७ मतदारसंघ भाजपच्या तर ४ मतदारसंघ सेनेच्या वाट्याला आहेत. परंतु, सेनेच्या वाट्याला असलेल्या जळगाव ग्रामीण, चोपडा, एरंडोल आणि पाचोरा या मतदारसंघांमध्ये भाजपच्या नाराज मंडळीने बंडखोरी केली आहे. जळगाव ग्रामीणमध्ये सेनेचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात भाजपचे भुसावळचे स्वीकृत नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे यांनी बंडखोरी केली आहे. अत्तरदे यांच्या पत्नी भाजपच्या जिल्हा परिषद सदस्या देखील आहेत.

हेही वाचा - भाजपला काही विचारा, उत्तर एकच 370; शरद पवारांचा भाजपला टोला

एकेकाळी गुलाबराव पाटील यांचे समर्थक असलेले जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण पाटील यांनी देखील गुलाबरावांच्या विरोधात मोट बांधून चंद्रशेखर अत्तरदे यांना पाठींबा जाहीर केला आहे. अशा परिस्थितीत मतांचे विभाजन होऊन त्याचा फटका बसण्याची भीती गुलाबरावांना आहे. लोकसभेवेळी सेनेच्या कार्यकर्त्यांची भाजपवर प्रचंड नाराजी असताना देखील युतीधर्म पाळायचा म्हणून आम्ही पायाला भिंगरी लावून भाजप उमेदवार उन्मेष पाटलांचा प्रचार केला. पण आता भाजप युती धर्म पाळताना दिसत नाही. भाजपने त्यांच्या बंडोबांना थंडोबा करावे, अन्यथा युतीवर दूरगामी परिणाम होतील. भाजपचे बंडखोर उमेदवार भाजपचे झेंडे हाती घेऊन चिन्हावर उघड प्रचार करत आहेत. यामुळे मतदार संभ्रमात पडले आहेत. ही बाब युती धर्माच्या विरोधात आहे. भाजपने युतीधर्म पाळायला हवा, असे मत गुलाबराव पाटलांनी व्यक्त केले आहे.

जिल्ह्यात बंडखोरीमुळे युतीत मतभेद
जळगाव ग्रामीण प्रमाणेच चोपड्यात सेनेच्या उमेदवार लता सोनवणे यांच्या विरोधात भाजपचे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे यांनी बंडखोरी केली आहे. पाचोऱ्यात सेनेचे विद्यमान आमदार किशोर पाटलांविरोधात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक अमोल शिंदेंनी बंड पुकारले आहे. त्याचप्रमाणे एरंडोल मतदारसंघात सेनेचे चिमणराव पाटील यांच्या विरोधात भाजपचे माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांनी बंडखोरी केली आहे. इतके वर्षे प्रामाणिकपणे सोबत राहिलो पण आपल्याला विश्वासात घेतले नाही. आता लोकांच्या आग्रहाखातर उमेदवारी केल्याचा दावा भाजपचे बंडखोर उमेदवार करत आहेत.

हेही वाचा - राज्यातील कुस्ती संघटनेचा अध्यक्ष मीच आहे; शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

जळगाव ग्रामीण मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांनी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटलांवर धक्कादायक आरोप केले आहेत. गेल्या पाच वर्षांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी एकही ठोस विकासकाम केलेले नाही. भाजपने केलेल्या विकासकामांचे उद्घाटन करत श्रेय घेण्याशिवाय दुसरे त्यांनी काहीही केले नसल्याचा आरोप अत्तरदे यांनी केला आहे. दरम्यान, अत्तरदे यांच्या पत्नी माधुरी अत्तरदे यांनीही गुलाबराब पाटील हे मंत्रिपदाचा दबाव आणून आपल्या गटात विकासकामे होऊ देत नाहीत. भाजपच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणतात. म्हणून कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आम्ही अपक्ष उमेदवार केल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या बंडखोरीमुळे सेनेच्या उमेदवारांना फटका बसून निकालाची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. युतीतील बंडखोरी हा विषय सध्या जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. आता २४ ऑक्टोबरला निकाल काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Intro:जळगाव
जिल्ह्यातील ११ पैकी ४ मतदारसंघात भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे सेनेच्या अडचणी वाढल्याने सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटलांचा पंतप्रधान मोदींच्या सभेपूर्वीच संताप झाला. भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या बंडखोरांना शांत करून युतीधर्म पाळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गुलाबराव पाटलांच्या संतापाचा उद्रेक झाल्याने सेनेच्या वाट्याला असलेल्या जळगाव ग्रामीण, चोपडा, एरंडोल आणि पाचोरा या मतदारसंघातील बंडखोरीचा मुद्दा तर ऐरणीवर आलाच आहे. शिवाय भाजप आणि सेनेत खरंच युती आहे का? असा प्रश्नही निर्माण झाला आहे.Body:जळगाव जिल्ह्यात विधानसभेचे ११ मतदारसंघ आहेत. युतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यात ७ मतदारसंघ भाजपच्या तर ४ मतदारसंघ सेनेच्या वाट्याला आहेत. परंतु सेनेच्या वाट्याला असलेल्या जळगाव ग्रामीण, चोपडा, एरंडोल आणि पाचोरा या मतदारसंघांमध्ये भाजपच्या नाराज मंडळीने बंडखोरी केली आहे. जळगाव ग्रामीणमध्ये सेनेचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात भाजपचे भुसावळचे स्वीकृत नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे यांनी बंडखोरी केली आहे. अत्तरदे यांच्या पत्नी भाजपच्या जिल्हा परिषद सदस्या देखील आहेत. एकेकाळी गुलाबराव पाटील यांचे समर्थक असलेले जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण पाटील यांनी देखील गुलाबरावांच्या विरोधात मोट बांधून चंद्रशेखर अत्तरदे यांना पाठींबा जाहीर केला आहे. अशा परिस्थितीत मतांचे विभाजन होऊन त्याचा फटका बसण्याची भीती गुलाबरावांना आहे. लोकसभेवेळी सेनेच्या कार्यकर्त्यांची भाजपवर प्रचंड नाराजी असताना देखील युतीधर्म पाळायचा म्हणून आम्ही पायाला भिंगरी लावून भाजप उमेदवार उन्मेष पाटलांचा प्रचार केला. पण आता भाजप युती धर्म पाळताना दिसत नाही. भाजपने त्यांच्या बंडोबांना थंडोबा करावे, अन्यथा युतीवर दूरगामी परिणाम होतील. भाजपचे बंडखोर उमेदवार भाजपचे झेंडे हाती घेऊन चिन्हावर उघड प्रचार करत आहेत. यामुळे मतदार संभ्रमात पडले आहेत. ही बाब युती धर्माच्या विरोधात आहे. भाजपने युतीधर्म पाळायला हवा, असे मत गुलाबराव पाटलांनी व्यक्त केले आहे.

जळगाव ग्रामीण प्रमाणेच चोपड्यात सेनेच्या उमेदवार लता सोनवणे यांच्या विरोधात भाजपचे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे यांनी बंडखोरी केली आहे. पाचोऱ्यात सेनेचे विद्यमान आमदार किशोर पाटलांविरोधात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक अमोल शिंदेंनी बंड पुकारले आहे. त्याचप्रमाणे एरंडोल मतदारसंघात सेनेचे चिमणराव पाटील यांच्या विरोधात भाजपचे माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांनी बंडखोरी केली आहे. इतके वर्षे प्रामाणिकपणे सोबत राहिलो पण आपल्याला विश्वासात घेतले नाही. आता लोकांच्या आग्रहाखातर उमेदवारी केल्याचा दावा भाजपचे बंडखोर उमेदवार करत आहेत. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांनी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटलांवर धक्कादायक आरोप केले आहेत. गेल्या पाच वर्षांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी एकही ठोस विकासकाम केलेले नाही. भाजपने केलेल्या विकासकामांचे उद्घाटन करत श्रेय घेण्याशिवाय दुसरे त्यांनी काहीही केले नसल्याचा आरोप अत्तरदे यांनी केला आहे. दरम्यान, अत्तरदे यांच्या पत्नी माधुरी अत्तरदे यांनीही गुलाबराब पाटील हे मंत्रिपदाचा दबाव आणून आपल्या गटात विकासकामे होऊ देत नाहीत. भाजपच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणतात. म्हणून कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आम्ही अपक्ष उमेदवार केल्याचे स्पष्ट केले आहे.Conclusion:दरम्यान, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या बंडखोरीमुळे सेनेच्या उमेदवारांना फटका बसून निकालाची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. युतीतील बंडखोरी हा विषय सध्या जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. आता २४ ऑक्टोबरला निकाल काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bytes : 1) गुलाबराव पाटील, सहकार राज्यमंत्री
2) चंद्रशेखर अत्तरदे, भाजपचे बंडखोर उमेदवार
3) माधुरी अत्तरदे, जिल्हा परिषद सदस्या
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.