ETV Bharat / state

'सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने सुशांतसिंहला न्याय मिळेल अशी आशा'

author img

By

Published : Aug 19, 2020, 7:44 PM IST

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार आहे. यामुळे सुशांतसिंहला न्याय मिळेल, अशी आशा ज्येष्ठ नेते एकनाथ यांनी व्यक्त केली आहे.

eknath khadse
एकनाथ खडसे

जळगाव - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासासंदर्भात महाराष्ट्र पोलीस आणि बिहार पोलीस एकमेकांवर अविश्वास व्यक्त करत होते. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार आहे. यामुळे सुशांतसिंहला न्याय मिळेल अशी आशा आहे, असी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली.

ते मुक्ताईनगर येथे आपल्या निवासस्थानी बोलत होते. ते पुढे म्हणाले, सुशांतसिंह प्रकरणात महाराष्ट्र पोलीस व बिहार पोलीस यांचा एकमेकांवर अविश्वास होता. त्याचबरोबर ते एकमेकांवर अनेक आरोप-प्रत्यारोप करत होते. आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयने करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यातील एकमेकांविषयी असलेले अविश्वासाचे वातावरण निवळण्यास मदत होईल, असेही खडसे म्हणाले.

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दाखल केलेल्या याचिकेवर आज (19 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी या प्रकरणाचा तपास सीबीआय करेल, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच सर्व पुरावे सीबीआयला देण्याचे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले. यावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा - सावधान..! बाजारात अप्रमाणित 'सॅनिटायझर'ची सर्रासपणे विक्री, अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.