ETV Bharat / state

जळगावात शिवसेनेचा डंका, बोदवड-मुक्ताईनगरातील भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे १२ नगरसेवक लावले गळाला

शिवसेनेने जोरदार धक्का देत बोदवड आणि मुक्ताईनगर नगरपालिकेतील भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे तब्बल १२ नगरसेवक गळाला लावले. या राजकीय उलथापालथीमुळे बोदवड व मुक्ताईनगर या दोन्ही नगरपालिका भाजपच्या हातून गेल्या आहेत. त्यावर आता शिवसेनेचा भगवा फडकला आहे.

Jalgaon
Jalgaon
author img

By

Published : Sep 25, 2021, 8:01 AM IST

जळगाव : राजकीय क्षेत्रासाठी शुक्रवारचा (24 सप्टेंबर) दिवस चर्चेचा ठरला. शिवसेनेने जोरदार धक्का देत बोदवड आणि मुक्ताईनगर नगरपालिकेतील भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे तब्बल १२ नगरसेवक गळाला लावले. या राजकीय उलथापालथीमुळे बोदवड व मुक्ताईनगर या दोन्ही नगरपालिका भाजपच्या हातून गेल्या आहेत. त्यावर आता शिवसेनेचा भगवा फडकला आहे.

शिवसेनेचा वाढतोय विस्तार -

पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि शिवसेनेचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील हे या साऱ्या राजकीय खेळीमागचे सूत्रधार आहेत. पक्षांतर करणाऱ्या सर्वच नगरसेवकांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना मुख्य भूमिकेत आहे. त्याचा फायदा पक्ष संघटन विस्तारासाठी केल्याचे दिसून येत आहे. याआधीही शिवसेनेने जळगाव महापालिकेत अशाच पद्धतीने भाजपचे २७ नगरसेवक फोडून सत्ता काबीज केली होती. त्यानंतर मुक्ताईनगर नगरपालिका आणि आता बोदवड नगरपालिका शिवसेनेने आपल्या ताब्यात खेचली आहे.

भाजपसह एकनाथ खडसेंना पुन्हा धक्का -

जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपालिकेतील नगराध्यक्षांसह भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी व अपक्ष असे ११ नगरसेवक व मुक्ताईनगर नगरपालिकेतील गटनेता यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकांत पाटील यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. भाजपसह राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. बोदवड आणि मुक्ताईनगर या दोन्ही नगरपालिकांवर भाजपची सत्ता आहे. मात्र, आज शिवसेनेत प्रवेश करणारे दोन्हीकडील भाजप नगरसेवक खडसे समर्थक मानले जातात. त्यामुळे शिवसेनेने जळगाव जिल्ह्यात भाजपसह राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना धक्का दिल्याचे बोलले जात आहे. या आधी काही महिन्यांपूर्वी मुक्ताईनगरातील ६ नगरसेवकांना प्रवेश देऊन शिवसेनेने धक्कातंत्र अवलंबले होते. त्यानंतर आता पुन्हा तोच कित्ता शिवसेनेने गिरवला आहे.

यांनी केला शिवसेनेत प्रवेश -

बोदवड येथील नगराध्यक्षा मुमताज बी सईद बागवान, नगरसेवक देवेंद्र समाधान खेवलकर, आफरीन सय्यद अस्लम बागवान, सुशिलाबाई मधुकर खाटीक, अकबर बेग मिर्झा, सुशिलाबाई आनंदा पाटील, नितीन रमेश चव्हाण, सुनील कडू बोरसे, सकिना बी शे. कलीम कुरेशी, आसमाबी शे. इरफान यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर, मुक्ताईनगर नगरपंचायतीत शिवसेनेने याआधी भाजप गटनेत्यांसह तब्बल ६ नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश दिला होता. हा प्रवेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच दिला होता. यानंतर शिवसेनेत प्रवेश केलेल्या गटनेत्याच्या जागेवर नीलेश प्रभाकर शिरसाठ यांची निवड झाली होती. आता पुन्हा शिवसेनेने भाजपचा दुसरा गटनेताही गळाला लावला आहे. गटनेते निलेश प्रभाकर शिरसाठ यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

हेही वाचा - गोवा निवडणुकीसाठी शिवसेनेनेही दंड थोपटले; 25 मतदारसंघात भाजपाला देणार टक्कर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.