ETV Bharat / state

बीएचआर घोटाळा प्रकरण: सुनिल झंवरच्या जळगावातील कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त कायम

author img

By

Published : Dec 9, 2020, 6:00 PM IST

बीएचआर सोसायटीतील घोटाळा प्रकरणी पाच संशयिताना पुणे आर्थिक गुन्हे शाखेने जळगावतून अटक केले होती. या पाचही जणांची आठ दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांची रविवारी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

BHR scam
सुनिल झंवरच्या जळगावातील कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त कायम

जळगाव - बीएचआर क्रेडीट सोसायटीतील अवसायकाच्या काळातील अपहारप्रकरणी पुणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात जळगावातील व्यावसायिक सुनिल झंवर यांच्या सील केलेल्या कार्यालयासमोर लावलेला बंदोबस्त आज देखील कायम आहे. या कार्यालयातून अनेक संशयास्पद दस्तऐवज पथकाने तपासासाठी हस्तगत केला आहे.

बीएचआर सोसायटीतील घोटाळा प्रकरणी पाच संशयिताना पुणे आर्थिक गुन्हे शाखेने जळगावतून अटक केले होती. या पाचही जणांची आठ दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांची रविवारी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. बीएचआरचा अवसायक जितेंद्र कंडारे, सुनील झंवर या दोन मुख्य संशयितांसह सहा जण अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

मुख्य संशयित सुनील झंवर अद्याप फरार-

दरम्यान, बीएचआर पतसंस्थेत सुनील झंवर याच्या सांगण्यावरुन बनावट वेबसाईट, अँप तयार केले व ही वेबसाईट झंवर याच्या कार्यालयातून चालविली जायची या संशयावरुन पोलिसांनी झंवरच्या जळगावातील रमेश ड्रायव्हिंग स्कूल या कार्यालयाची झाडाझडती घेतली होती. या झडतीमध्ये माजी मंत्री महाजन यांचे लेटरपॅड, महापालिकेच्या सफाई ठेक्याची कंपनी असलेल्या वॉटरग्रेसचे कागदपत्र तसेच १०० पेक्षा जास्त एटीएम कार्ड मिळुन आले. त्या अनुशंगाने पुण्याच्या पथकाने झंवरच्या कार्यालयातून महत्त्वाचे दस्तऐवज, संगणकीय पुरावे हस्तगत करुन ते पुणे येथे नेले होते. त्यानतंर दि. १ डिसेंबर रोजी मंगळवार सुनिल झंवर याचे हे कार्यालय सील करुन या ठीकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज देखील सुनिल झंवर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मात्र, तरी देखील जळगाव येथिल त्याच्या कार्यालयावर पोलिस बंदोबस्त कायम आहे. तसेच बीएचआर संस्थेचे एमआयडीसीतील मध्यवर्ती कार्यालय देखील सील करण्यात आले असून तेथे देखील अद्याप बंदोबस्त तैनात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.