ETV Bharat / state

Chalisgaon Court : चाळीसगाव न्यायालयात वकिलाला पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न - jalgaon latest news

एका जुन्या दिवाणी दाव्यामध्ये वकील म्हणून काम करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून, एका वयोवृद्धाने त्या वकिलाच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न ( Attempt to set fire to lawyer ) केला.

Chalisgaon court
वकिलाला पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न
author img

By

Published : Apr 27, 2022, 12:46 PM IST

Updated : Apr 27, 2022, 2:54 PM IST

जळगाव - जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. एका जुन्या दिवाणी दाव्यामध्ये वकील म्हणून काम करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून, एका वयोवृद्धाने त्या वकिलाच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न ( Attempt to set fire to lawyer ) केला. यावेळी इतर वकील वेळीच मदतीसाठी धावून आल्याने मोठा अनर्थ टळला. चाळीसगाव न्यायालयात वकील संघाच्या ( Advocates Association Chalisgaon Court ) दालनासमोरील व्हरांड्यात मंगळवारी सकाळी ही घटना घडली. पाेलिसांनी याप्रकरणी करजगाव येथील किसन मोतीराम सांगळे या वयोवृद्धाला ताब्यात घेतले आहे.

वकिलाला पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न, प्रतिक्रिया

असा घडला प्रकार - अॅड. सुभाष ताेताराम खैरनार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २०१० ते २०१३ दरम्यान करजगाव येथील किसन सांगळे यांनी त्यांच्या शेतजमिनीच्या दिवाणी वादाबाबत, चाळीसगाव न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यांच्या वतीने अॅड. खैरनार यांनी खटला चालवला होता. तसेच त्यांच्या बाजूने मनाई हुकूम पारित करून दिला होता. त्यानंतर सांगळे यांच्या दुसऱ्या जमिनीबाबत असलेल्या दिवाणी दाव्यात, अॅड. खैरनार यांनी त्यांना दुसरा वकील नेमावा असे सांगितले होते. दोन्ही दाव्यांचा निकाल सांगळे यांच्या बाजूने लागला होता. त्यानंतर जमिनीबाबतच्या जळगाव दिवाणी न्यायालयातील दाव्याचा निकाल सांगळे यांच्या विरोधात लागला. हे दावे अॅड. खैरनार यांनी लढवले नसताना सांगळे यांनी अॅड. खैरनार चाळीसगाव न्यायालयात वकिलाला पेटवण्याचा प्रयत्न व इतर तीन वकिलांविरोधात बार असोसिएशनकडे तक्रार केली होती. त्यावर सध्या सुनावणी सुरू आहे. असे असताना अॅड. एस.टी. खैरनार हे मंगळवारी सकाळी ११.३० सुमारास वकील संंघाबाहेरील ओट्यावर सुपुत्र अॅड. उदय खैरनार यांच्याशी चर्चा करत होते. त्याचवेळी किसन सांगळे यांनी पिशवीतून पेट्रोलची बाटली काढत अॅड. सतीश खैरनार यांच्या अंगावर पेट्रोल ओतले. तसेच आगपेटी काढून काडी पेटवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी अॅड. रणजित पाटील, अॅड. धीरज पवार, अॅड. राहुल पाटील, अॅड. भागवत पाटील हे मदतीला धावून आले. त्यांनी सांगळे यांच्या हाताला झटका देऊन आगपेटी खाली पाडली. त्यानंतर वकिलांनी सांगळे यांना न्यायालयात असलेल्या केस वॉच पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी अॅड. सुभाष खैरनार यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून किसन सांगळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास एपीआय सागर ढिकले करत आहेत.

हेही वाचा - Chariot Accident at Thanjavur : तंजावरमध्ये रथाला विजेचा धक्का लागल्याने 11 जण ठार

Last Updated : Apr 27, 2022, 2:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.