ETV Bharat / state

जळगावच्या अर्चित पाटीलची 'प्रधानमंत्री राष्ट्रीय बालशक्ती पुरस्कारा'साठी निवड - Prime Minister Award Archit Patil Jalgaon

शहरातील अर्चित राहुल पाटील या विद्यार्थ्याची 'प्रधानमंत्री राष्ट्रीय बालशक्ती पुरस्कारा'साठी निवड झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वतीने ऑनलाइन पद्धतीने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते अर्चितला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संशोधक अर्चित पाटील जळगाव
Balshakti Award Archit Patil Jalgaon
author img

By

Published : Jan 25, 2021, 7:21 PM IST

जळगाव - शहरातील अर्चित राहुल पाटील या विद्यार्थ्याची 'प्रधानमंत्री राष्ट्रीय बालशक्ती पुरस्कारा'साठी निवड झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वतीने ऑनलाइन पद्धतीने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते अर्चितला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सध्या प्रातिनिधिक स्वरुपात हा पुरस्कार देण्यात आला असून, लवकरच त्याला पंतप्रधानांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. दरम्यान, अर्चितने राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराला गवसणी घातल्याने जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

माहिती देताना अर्चित व त्याचे आई वडील

हेही वाचा - भालचंद्र नेमाडे यांच्याविरोधात अदखलपात्र तक्रारीची नोंद

अर्चित पाटील हा जळगावातील प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉ. राहुल पाटील व डॉ. अर्चना पाटील यांचा मुलगा आहे. तो शहरातील काशिनाथ पलोड इंग्लिश मीडियम स्कुलचा इयत्ता नववीचा विद्यार्थी आहे. अर्चितने राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळवल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

काय आहे अर्चितचे संशोधन?

अर्चितने अल्ट्रा लो कॉस्ट सिलिकॉन डिव्हाईस म्हणजेच 'पोस्ट पार्टम हॅमरेज कप' (पीपीएच कप) हे उपकरण तयार केले आहे. या उपकरणाच्या माध्यमातून प्रसुतीनंतर मातेच्या शरिरातून होणारा रक्तस्त्राव अगदी बरोबर मोजता येतो. या माध्यमातून प्रसूत झालेल्या मातेच्या शरिरातून अतिप्रमाणात रक्तस्त्राव होत आहे किंवा नाही, याचा अंदाज डॉक्टरांना येतो. जर, प्रसूत मातेच्या शरिरातून अतिप्रमाणात रक्तस्त्राव होत असेल तर 'गोल्डन अवर'मध्ये योग्य उपचार करून त्या मातेचा जीव वाचवता येऊ शकतो. अशा प्रकारच्या उपकरणाचा अद्याप शोध लागलेला नव्हता. अर्चितने ते उपकरण शोधून काढले आणि त्याच उपकरणाची केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाने दखल घेत 'प्रधानमंत्री राष्ट्रीय बालशक्ती पुरस्कारा'साठी अर्चितची निवड केली.

अनेक स्पर्धांमध्ये झाली आहे उपकरणाची निवड

अर्चितने बनवलेल्या उपकरणाची निवड अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये झाली आहे. त्यात इन्स्पायर मानक अवॉर्ड 2020, एमएस सिग्नेचर अवॉर्ड 2020, सीएसआयआर इनोव्हेशन अवॉर्ड फॉर स्कुल चिल्ड्रेन 2020, आयआरआयएस नॅशनल सायन्स फेअर, अमेरिकन सोसायटी फॉर इंजिनिअर्स अशा प्रकारच्या स्पर्धांचा समावेश आहे. सॅनिटरी वेस्टच्या पर्यावरणपूरक विघटनाच्या प्रेझेन्टेशनसाठी अर्चितला यापूर्वी 2017-18 मध्ये डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले आहे. या शिवाय अर्चितने अनेक जिल्हा, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे.

दोन दिवसापूर्वी मिळाली पुरस्काराची माहिती

अर्चितने केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाकडे प्रधानमंत्री राष्ट्रीय बालशक्ती पुरस्कारासाठी जुलै 2020 मध्ये प्रस्ताव पाठवला होता. त्यात उपकरणाची पुरस्कारासाठी निवड झाल्याचे त्याला दोन दिवसापूर्वी कळवण्यात आले. आज त्याला जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वतीने पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आई-वडिलांना झाला आनंद; म्हणाले 'अर्चितने नाव कमावले'

राष्ट्रीय स्तरावरील प्रधानमंत्री राष्ट्रीय बालशक्ती पुरस्कारासाठी अर्चितची निवड झाल्याने त्याचे आई-वडील अतिशय आनंदात आहेत. त्यांनी आपल्या मुलाने देशपातळीवर नाव कमावले आहे, याचा मनस्वी आनंद आहे. या पुढेही त्याने देशासाठी असे संशोधन करावे. यासाठी आपला त्याला नेहमी पाठिंबा असेल, अशा भावना अर्चितचे आई-वडील डॉ. राहुल पाटील व डॉ. अर्चना पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केल्या.

मला देशाच्या कामी येईल, असे संशोधन करायचे आहे

राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी निवड झाल्यानंतर काय वाटते, याबाबत अर्चितला विचारणा केली असता त्याने सांगितले की, मला जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठात अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आपल्या देशाच्या कामी येईल असे मोठे संशोधन करायचे आहे. जेणेकरून माझ्या आई-वडिलांना अभिमान वाटेल, अशी प्रतिक्रिया अर्चितने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.

अशी सुचली उपकरणाची संकल्पना?

अर्चितचे आई-वडील डॉक्टर आहेत. ते रात्री-अपरात्री प्रसुतीसाठी घराबाहेर जात असत. अशावेळी घरी कुणीही नसल्याने अर्चित त्यांच्यासोबत जायचा. तेव्हा अतिरक्त स्त्रावामुळे मातेच्या मृत्यूबाबत तो नेहमी ऐकत असे. त्याला मेन्स्ट्रुअल कपबाबत माहिती होती. याच कपच्या माध्यमातून त्याने पीपीएच कप डेव्हलप केला. तो कप म्हणजेच पोस्ट पार्टम हॅमरेज कप होय. या उपकरणाची आता राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली असून, अर्चितला प्रधानमंत्री राष्ट्रीय बालशक्ती पुरस्कार जाहीर झाला आहे.

हेही वाचा - भामट्याने तयार केले एसपी डॉ. प्रवीण मुंढेंचे बनावट फेसबुक अकाऊंट, सायबर सेलकडून चौकशी सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.