ETV Bharat / state

गोपीनाथ मुंडे असते तर माझ्यावर अन्याय झाला नसता- एकनाथ खडसे

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडेंनी आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी एकनाथ खडसे आज सायंकाळी भगवान गडावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी मुक्ताईनगरात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी खडसेंनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावनांना वाट करून दिली.

jalgaon
एकनाथ खडसे
author img

By

Published : Dec 11, 2019, 3:27 PM IST

जळगाव- गोपीनाथ मुंडे हे भाजपचे ज्येष्ठ नेते होते. आज ते हयात राहिले असते तर माझ्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यावर अन्याय झाला नसता, अशी खळबळजनक प्रतिक्रिया भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, खडसेंनी आज पुन्हा एकदा आपल्या मनातील खदखद व्यक्त करत भाजप पक्ष नेतृत्त्वावर टीका केली आहे.

प्रतिक्रिया देताना भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडेंनी आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी एकनाथ खडसे आज सायंकाळी भगवान गडावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी मुक्ताईनगरात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी खडसेंनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावनांना वाट करून दिली. ते पुढे म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण तर झालीच, शिवाय भाजपमध्येही त्यांच्या जाण्यामुळे कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली.

गोपीनाथ मुंडे असते तर, नसते तर अशा चर्चा देखील आता होत आहेत. गोपीनाथ मुंडे हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना एक आधार वाटत होते. आज ते राहिले असते तर कदाचित भाजप आणि सेनेतील युती कायम राहिली असती. भाजपची आज जी अवस्था आहे त्यापेक्षा निश्चित चांगली अवस्था आज भाजपची राहिली असती, अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची भावना आहे. सर्वपक्ष नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. गोपीनाथ मुंडे यांची सदैव समन्वयाची भूमिका असायची, असेही खडसे यावेळी म्हणाले.

दुर्दैवाने मुंडे आज नाहीत

गोपीनाथ मुंडे हे नेहमी मार्गदर्शकाच्या भूमिकेत असायचे. कधी कधी ते आपली चूक उदार मनाने मान्य देखील करायचे. हाच त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. दुर्दैवाने आज ते आपल्यात नाहीत. दररोज त्यांचे मार्गदर्शन मिळावे, असे आम्हाला आता वाटते, अशी भावनिक प्रतिक्रिया देखील खडसेंनी यावेळी व्यक्त केली.

हेही वाचा- सीसीआयची कापूस खरेदी जोरात; शेतकऱ्यांना मिळतोय साडेपाच हजारापर्यंतचा भाव

Intro:जळगाव
गोपीनाथ मुंडे हे भाजपचे ज्येष्ठ नेते होते. आज ते हयात राहिले असते तर माझ्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यावर अन्याय झाला नसता, अशी खळबळजनक प्रतिक्रिया भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, खडसेंनी आज पुन्हा एकदा आपल्या मनातील खदखद व्यक्त करत भाजप पक्ष नेतृत्त्वावर टीका केली आहे.Body:गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडेंनी आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी एकनाथ खडसे आज सायंकाळी भगवान गडावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी मुक्ताईनगरात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. खडसेंनी यावेळी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावनांना वाट करून दिली. ते पुढे म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण तर झालीच, शिवाय भाजपमध्येही त्यांच्या जाण्यामुळे कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली. गोपीनाथ मुंडे असते तर गोपीनाथ मुंडे नसते तर अशा चर्चा देखील आता होत आहेत. गोपीनाथ मुंडे हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना एक आधार वाटत होते. आज ते राहिले असते तर कदाचित भाजप आणि सेनेतील युती कायम राहिली असती. भाजपची आज जी अवस्था आहे, त्यापेक्षा निश्चित चांगली अवस्था आज भाजपची राहिली असती, अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची भावना आहे. सर्वपक्ष नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. गोपीनाथ मुंडे यांची सदैव समन्वयाची भूमिका असायची, असेही खडसे यावेळी म्हणाले.Conclusion:दुर्दैवाने मुंडे आज नाहीत-

गोपीनाथ मुंडे हे नेहमी मार्गदर्शकाच्या भूमिकेत असायचे. कधी कधी ते आपली चूक उदार मनाने मान्य देखील करायचे. हाच त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. दुर्दैवाने आज ते आपल्यात नाहीत. दररोज त्यांचे मार्गदर्शन मिळावे, असे आम्हाला आता वाटते, अशी भावनिक प्रतिक्रिया देखील खडसेंनी यावेळी व्यक्त केली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.