जळगाव : सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयास स्टिंग ऑपरेशन करून त्याबाबतचे पुरावे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis Allegation On Pravin Chavhan ) यांनी विधानसभेत सादर केल्याप्रकरणी आरोप होत असलेला तेजस मोरे ( Tejas More Jalgaon ) हा जळगावमधील आहे. चव्हाण यांच्या कार्यालयात स्टिंग ऑपरेशन ( Jalgaon Sting Operation ) केल्याचा आरोप त्याच्यावर होत आहे. त्यामुळे या प्रकरणाचे 'जळगाव कनेक्शन' उघड झाले आहे.
अशी आहे त्याची पार्श्वभूमी
तेजस मोरे याचे वडील अभियंता होते. तर तेजस हा बांधकाम व्यावसायिक असून, गेल्या तीन ते चार वर्षांपासून त्याचे जळगावातील घर बंद आहे. त्याने काहीतरी घोटाळा केला आहे. त्यामुळे त्याच्या घरी पोलिस यायचे. असं त्याचे शेजारी सांगतात. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे स्टिंग ऑपरेशन केल्याचा आरोप असणारा तेजस मोरे हा तरुण जळगावचा असल्याचे नुकतेच समोर आलेय. वकील चव्हाण यांनी हे स्टिंग ऑपरेशन तेजस मोरे याने केल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे.
२०१९ मधील आहे गुन्हा
धक्कादायक म्हणजे या तेजसवर जळगाव शहर पोलिस ठाण्यात २०१९ मध्ये रोजी खंडणीचा गुन्हा दाखल ( Ransom Charge On Tejas More ) आहे. या गुन्ह्यात त्याला अटकही करण्यात आली होती. तसेच या गुन्ह्याचे दोषारोपपत्रही जळगाव जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आले असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ प्रविण मुंढे यांनी सांगितले.