ETV Bharat / state

जळगाव : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनल; तर जागा वाटपही लवकरच होणार

author img

By

Published : Aug 31, 2021, 12:01 AM IST

सोमवारी झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत जिल्हा बँकेची निवडणूक चारही पक्षांच्या सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून एकत्र लढण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. तर पुढच्या एक-दोन बैठकांमध्ये जागा वाटपाचा तिढाही सुटेल, असा विश्वास नेत्यांनी वर्तवला.

Jalgaon latest news
Jalgaon latest news

जळगाव - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापू लागले आहे. सोमवारी झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत ही निवडणूक चारही पक्षांच्या सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून एकत्र लढण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे दिसत आहेत. पुढच्या एक-दोन बैठकांमध्ये जागा वाटपाचा तिढाही सुटेल, असा विश्वास नेत्यांनी वर्तवला. दरम्यान, या निवडणुकीच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी चारही पक्षांचे प्रत्येकी दोन सदस्य असलेली कोअर कमिटी गठीत झाली आहे. या बैठकीसाठी एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे व भाजप नेते गिरीश महाजन हे एकत्र आले होते.

प्रतिक्रिया

अशी आहे 8 सदस्यीय कोअर कमिटी -

पहिल्याच बैठकीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे निर्णय घेण्यासाठी चारही पक्षांचे 8 सदस्यांचा समावेश असलेली कोअर कमिटी गठीत करण्यात आली आहे. या कमिटीत शिवसेनेकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, भाजपकडून माजीमंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजीमंत्री एकनाथ खडसे, गुलाबराव देवकर आणि काँग्रेसकडून आमदार शिरीष चौधरी व ॲड. संदीप पाटील यांचा समावेश आहे.

खडसे-महाजन बसले शेजारी-शेजारी -

या बैठकीसाठी माजीमंत्री गिरीश महाजन व एकनाथ खडसे एकत्र येतात की नाही? याबाबत दिवसभर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, सायंकाळी या बैठकीला हे दोन्ही नेते एकत्र आले. हे दोन्ही नेते एकमेकांच्या शेजारी बसले. मात्र, त्यांच्यात संवाद झाला नाही. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देखील या नेत्यांनी एकमेकांची नावे घेणे टाळले.

बैठकीत काय घडले? -

या बैठकीत गिरीश महाजन यांनी जागा वाटपासह अध्यक्ष-उपाध्यक्ष पददेखील वाटून घेण्याचे मत मांडले. यावर सव्वा-सव्वा वर्ष हे पद देण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली. तसेच याबाबत ठाम निर्णय कोअर कमिटीच्या पुढील बैठकीत घेण्याचे ठरले. माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी यापुढे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदावर ॲड.रोहिणी खडसे व स्वत: इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले. विकास सोसायटी मतदार संघातील विद्यमान संचालक कायम ठेवण्याबाबत देखील चर्चा झाली. मात्र, यामध्ये जागा वाटप समान करून घेण्याबाबत चर्चा झाली.

यांची होती उपस्थिती -

सर्वपक्षीय पॅनलच्या चाचपणीसाठी अजिंठा विश्रामगृहात झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजीमंत्री गिरीश महाजन, एकनाथ खडसे, डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, आमदार चिमणराव पाटील, किशोर पाटील, मंगेश चव्हाण, शिरीष चौधरी, अनिल पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, दिलीप वाघ, वाल्मीक पाटील, प्रदीप देशमुख, उदय पाटील, संतोष चौधरी, डी.जी.पाटील यांच्यासह राष्ट्रवादी व शिवसेनेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.

हेही वाचा - घाटकोपरमध्ये मनसेकडून पाच थराची दहीहंडी साजरी, कार्यकर्त्यांकडून निर्बंधांबाबत तीव्र प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.