ETV Bharat / state

जळगाव : आरोग्य क्षेत्रातील कोरोना योद्धांच्या पाठीवर कौतुकाची थाप - जळगाव कोरोना योद्धा सत्कार बातमी

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्यावतीने कोरोना महामारीच्या काळात आपल्या जिवाची पर्वा न करता आरोग्यसेवेत उल्लेखनीय काम करणाऱ्या योद्ध्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

acknowledgment of  corona warriors work during pandemic in jalgaon
जळगाव : आरोग्य क्षेत्रातील कोरोना योद्धांच्या पाठीवर कौतुकाची थाप
author img

By

Published : Jan 3, 2021, 5:19 PM IST

जळगाव - महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्यावतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रविवारी दुपारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोरोना महामारीच्या काळात आपल्या जिवाची पर्वा न करता आरोग्यसेवेत उल्लेखनीय काम करणाऱ्या योद्ध्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात हा मेळावा पार पडला. यावेळी कास्ट्राईब दिनदर्शिकेचेदेखील मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

परमेश्वर माटे यांंची प्रतिक्रिया

सन्मानाने भारावले कोरोना योद्धे -

कोरोना महामारीच्या काळात आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांनी शासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आरोग्य सेवा बजावली. आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी राज्य शासनाच्या प्रयत्नांना साथ दिली. त्यामुळेच कोरोनावर नियंत्रण करणे शक्य झाले. अशा कोरोना योद्धांच्या कार्याचा सन्मान व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्यावतीने सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात 60 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

राज्य शासनाने आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करावा -

आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांनी कोरोना महामारीच्या काळात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. राज्य शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेणे गरजेचे आहे. आरोग्य क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. त्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजे, अशी अपेक्षा परमेश्वर माटे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.