ETV Bharat / state

जळगावातील दोन व्यापाऱ्यांना ६२ लाखांना गंडा, आरोपी अटकेत - जळगावातील दोन व्यापाऱ्यांना लाखोंचा गंडा

दोन व्यापाऱ्यांची ६१ लाख ७६ हजारांना फसवणूक करणाऱ्या आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. आज न्यायालयात हजर केले असता त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Jalgaon traders of Rs 62 lakh
जळगाव व्यापाऱ्यांना गंडा
author img

By

Published : Nov 11, 2020, 10:17 PM IST

जळगाव - दोन वर्षांपूर्वी चनाडाळ व्यवसाय करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांची ६१ लाख ७६ हजारांना फसवणूक करणाऱ्या बार्शी (जि. सोलापूर) येथील अभिजित कापसे याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. आज न्यायालयात हजर केले असता त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अधिक माहिती अशी की, फिर्यादी संजय नंदलाल व्यास (वय-५०, रा. विवेकानंद नगर, जिल्हापेठ जळगाव) याचे एमआयडीसीत व्यास इंडस्ट्रिज नावाची दालमिल कंपनी आहे. तसेच त्यांचे मित्र राजेश ओंकार अग्रवाल यांचे पुष्पा पल्सेस नावाचे चनादाल कंपनी आहे. दोघे चांगले मित्रही आहे. त्यांच्या चनादाळचा व्यवसाय असल्याने अनेक ठिकाणी व्यवसायाचा व्यवहार होतात. असाच व्यवहार ६ जानेवारी २०१८ मध्ये संशयित आरोपी अभिजित अरूण कापसे (वय-२६, रा. ज्योतीबाची वाडी, ता. बार्शी जि. सोलापूर) यांच्याशी व्यवहार झाला फिर्यादी संजय व्यास यांनी ३० लाख ८ हजार आणि त्यांचे मित्र राजेश अग्रवाल यांनी ३१ लाख ६८ हजार रूपये किंमतीची चनादाळ दिली. व्यवहार झाल्यानंतर संशयित आरोपी अभिजित कापसे यांने दोघांना प्रत्येकी २५ लाख रूपयांचे धनादेश दिला. मात्र बँकेत रक्कम पुरेशी नसल्याने दोन्ही धनादेश वटला नाही. तसेच उर्वरीत ११ लाख ७६ हजार देणे बाकी होते. फिर्यादी संजय व्यास आणि त्यांचे मित्र राजेश अग्रवाल यांनी पैशांचा तगादा लावला असता पैसे दिले मिळाले नाही.

संजय व्यास यांच्या फिर्यादीवरून २१ ऑगस्ट २०२० रोजी एमआयडीसी पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आज पोलीसांनी संशयित आरोपी अभिजित ठाकूर याला अटक केली आहे. आज न्यायालयात हजर केले असता न्या. सुवर्णा कुळकर्णी यांनी सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे ॲड. प्रिया मेढे यांनी काम पाहिले. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे करीत आहे.

कारवाई करणारे पथक-
अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित आरोपी अभिजित ठाकूर याला गावातून रात्री बारा वाजता अटक केली. यासाठी सपोनि अमोल मोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, विजय बावस्कर यांनी ही कारवाई केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.