ETV Bharat / state

जळगाव महापालिकेची थकबाकीदारांसाठी 'अभय' योजना

कोरोना काळात थकलेली मालमत्ताकराची वसुली करण्यासाठी तसेच थकबाकीदारांना दिलासा देण्याच्या उद्देशाने जळगाव महापालिकेने 'अभय' योजना जाहीर केली आहे.

author img

By

Published : Jan 5, 2021, 10:22 PM IST

Updated : Jan 5, 2021, 10:31 PM IST

जळगाव महापालिका
जळगाव महापालिका

जळगाव - कोरोना काळात थकलेली मालमत्ताकराची वसुली करण्यासाठी तसेच थकबाकीदारांना दिलासा देण्याच्या उद्देशाने जळगाव महापालिकेने 'अभय' योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार 7 जानेवारीपासून ते फेब्रुवारी अखेरपर्यंत मालमत्ता कराची थकबाकी भरल्यास शास्ती अर्थात दंडाच्या रक्कमेवर तीन टप्प्यांत 75 टक्क्यांपासून ते 25 टक्क्यांपर्यंतची सूट देण्यात येणार आहे, अशी माहिती मंगळवारी (दि. 5 जाने.) आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिली.

आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी अभय योजनेची माहिती देण्यासाठी मंगळवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी आयुक्त कुलकर्णी होते.

बोलताना महापालिका आयुक्त

थकबाकीचा भरणा होत नाही, तोपर्यंत दंड लावणार

ते म्हणाले, आतापर्यंत मालमत्ता कराच्या थकबाकीवर एका वर्षापर्यंत दरमहा 2 टक्के दंड लावण्यात येणार होता. तो दंड आता जोपर्यंत थकबाकीचा भरणा होत नाही, तोपर्यंत लावला जाणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

थकबाकीदारांना दंडात सूट

कोरोनाच्या काळात यंदा मालमत्ता कराची बिले विलंबाने वाटप करण्यात आली. त्यामुळे मालमत्ता कराची वसुली देखील प्रभावीपणे झाली नाही. तसेच कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला आहे. या दृष्टीने महापालिका प्रशासनाने मालमत्ता कराच्या थकबाकीची वसुली व्हावी तसेच थकाबाकीदारांना दिलासा मिळावा, या उद्देशाने महापालिका पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन अभय योजना आणल्याचे आयुक्तांनी सांगितले. महापालिका अधिनियमातील मालमत्ता कराच्या एका कलमानुसार थकबाकीवर लावण्यात आलेल्या दंडात सवलत देण्याचा अधिकार आहे. त्यानुसार जळगाव शहरातील मालमत्ताकराच्या थकबाकीदारांना दंडात सूट देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

काय आहे अभय योजना?

येत्या 7 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अभय योजनेनुसार थकबाकीदारांनी 31 जानेवारीपर्यंत मालमत्ता कराची थकबाकी भरल्यास त्यांना दंडाच्या रक्कमेत 75 टक्के सूट मिळणार आहे. तर 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत भरणा केल्यास 50 टक्के सूट तर 15 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारीपर्यंत थकबाकीचा भरणा केल्यास 25 टक्के सूट मिळणार आहे.

पुढील दंडाचा बोजाही टळणार

जळगाव महापालिका आतापर्यंत मालमत्ता कराच्या थकबाकीवर दरमहा दोन टक्के दंड केवळ एक वर्षापर्यंतच आकारणी करत होती. मात्र, 1 एप्रिल, 2021 पासून थकबाकीचा भरणा होत नाही, तोपर्यंत दरमहा 2 टक्के दंडाची आकारणी करण्यात येणार आहे. दि. 31 मार्च, 2021 पर्यंत कराच्या थकबाकीचा भरणा न केल्यास पहिल्यापासून दरमहा 2 टक्के दंडाची आकारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे अभय योजनेचा लाभ घेतल्यास अथवा 31 मार्च, 2021 पर्यंत कराची थकबाकी भरल्यास थकबाकीदारांवर पडणारा आर्थिक बोजा देखील टळणार असल्याची माहिती आयुक्त कुलकर्णी यांनी दिली.

हेही वाचा - जळगावात बनावट दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त; पाच जणांना अटक

हेही वाचा - 'राजकीय दबावापोटी गिरीश महाजनांवर उशिराने गुन्हा दाखल'

Last Updated : Jan 5, 2021, 10:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.