ETV Bharat / state

जळगावातील माशाच्या आकाराच्या बाळाचा अवघ्या 12 तासांत मृत्यू - baby died news

अशा पद्धतीने जन्माला आलेले हे खान्देशातील कदाचित पहिलेच बाळ असेल, असा दावा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला आहे. दुर्मीळ पद्धतीने जन्मलेल्या या बाळाचा मृतदेह अभ्यासाच्या दृष्टीने शरीररचनाशास्त्र विभागात ठेवण्यात आला आहे.

baby
baby
author img

By

Published : Dec 27, 2020, 3:09 PM IST

Updated : Dec 27, 2020, 7:10 PM IST

जळगाव - शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात एका महिलेने शुक्रवारी विचित्र शरीररचना असलेल्या बाळाला जन्म दिला. या बाळाच्या शरीराचा आकार हा माशाप्रमाणे होता. शनिवारी दुपारी बाळाचा मृत्यू झाला. दुर्दैवाने या बाळाच्या वाट्याला अवघ्या 12 तासांचे आयुष्य आले. अशा पद्धतीने जन्माला आलेले हे खान्देशातील कदाचित पहिलेच बाळ असेल, असा दावा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला आहे. दुर्मीळ पद्धतीने जन्मलेल्या या बाळाचा मृतदेह अभ्यासाच्या दृष्टीने शरीररचनाशास्त्र विभागात ठेवण्यात आला आहे.

माहिती देताना तज्ज्ञ

शरीराची घडण अत्यंत दुर्मीळ

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील एका गावातील महिलेला शुक्रवारी दुपारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. दुपारी 4 वाजता महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे आणि डॉक्टरांनी या महिलेची प्रसूती केली. प्रसूती होत असताच एका विचित्र घटनेचा प्रत्यय डॉक्टरांना आला. या बाळाच्या शरीराची घडण अत्यंत दुर्मीळ असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. प्रसूतीपूर्वी या महिलेवर स्थानिक पातळीवर उपचारही सुरू होते. शिवाय वेळोवेळी सोनोग्राफीही करण्यात आली होती. मात्र, त्यात बाळाच्या शारीरिक व्यंगाविषयी काहीही समोर आले नव्हते. मात्र, बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या शरीराचा आकार एखाद्या माशाप्रमाणे असल्याचे दिसून आले.

नेमके काय होते व्यंग?

या बाळाच्या पोटाखालील पूर्ण भाग म्हणजेच दोन्ही पाय हे एकमेकांना चिकटलेले होते. त्याच्या शरीराची रचना अगदी एखाद्या माशाच्या शरीररचनेसारखी होती. पोटाखाली संपूर्ण भागात व्यंग होते. शिवाय बाळाला किडनी नव्हती, या व्यंगाला वैद्यकीय भाषेत 'सिरोनोमेलिया' म्हटले जाते. अर्थात मत्सपरी अशा प्रकारची बालके ही अगदीच अति दुर्मीळ पद्धतीने जन्माला येत असतात आणि त्यांचे जीवनमान हे अगदीच काही तासांचे असते. परंतु, जळगाव जिल्हा रुग्णालयात जन्मलेले हे बाळ 12 तास जिवंत होते, अशी माहिती स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी दिली.

असे व्यंग का?

वैद्यकीय तज्ञांच्या मते हा पर्यावरणीय व जनुकीय परिणाम असू शकतो. याबाबत ठोस पुरावे नसले तरी हा प्राथमिक अंदाज असू शकतो. बाळाची मातेच्या पोटात जडघडण होत असताना बाळाच्या धमन्यांना सुरळीत रक्तपुरवठा न झाल्याने अशा प्रकारचे व्यंग येण्याची शक्यता असते. आंबेजोगाई येथे असतानाही अशाच प्रकारे एका दुर्मीळ बाळाचा जन्म झाला होता. ते बाळ अवघ्या 15 मिनटांतच दगावले होते, जळगावात असे बाळ पहिल्यांदा जन्मले, असे डॉ. बनसोडे यांनी सांगितले.

Last Updated : Dec 27, 2020, 7:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.