ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात पुन्हा 986 नवे कोरोनाबाधित; 6 जणांचा बळी

जळगाव जिल्ह्यात पुन्हा 986 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 6 जणांचा बळी घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण 69 हजार 648 इतकी झाली.

author img

By

Published : Mar 13, 2021, 9:45 PM IST

986 new corona cases have been reported and 6 people have been killed In, Jalgaon district
जळगाव जिल्ह्यात पुन्हा 986 नवे कोरोनाबाधित; 6 जणांचा बळी

जळगाव - जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग अतिशय वेगाने सुरू आहे. शनिवारी दिवसभरात पुन्हा 986 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. चिंतेची बाब म्हणजे, एकीकडे मोठ्या संख्येने बाधित रुग्ण आढळत असताना, दुसरीकडे कोरोनाच्या बळींची संख्या कमी होत नसून ती वाढतच आहे. शनिवारी दिवसभरात 6 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला.

जळगाव जिल्हा प्रशासनाला शनिवारी रात्री 5 हजार 126 तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यातील 986 अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण 69 हजार 648 इतकी झाली. शनिवारी 418 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. आतापर्यंत 60 हजार 935 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 7 हजार 275 -

जळगाव जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 7 हजार 275 वर पोहचली आहे. त्यात 5 हजार 792 रुग्णांना कोरोनाची लक्षणे नाहीत, तर 1 हजार 483 रुग्णांना लक्षणे आहेत. जिल्ह्यातील 4 हजार 952 रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत.

जळगावात पुन्हा आढळले त्रिशतकापेक्षा अधिक रुग्ण-

जळगाव शहरातील परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. शहरात कोरोनाचा संसर्ग काही केल्या थांबत नसल्याचे चित्र आहे. शनिवारी जळगावात पुन्हा त्रिशतकापेक्षा अधिक संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले. तब्बल 350 रुग्ण एकट्या जळगाव शहरातून आढळले. त्याचप्रमाणे, चोपडा तालुक्यात 141, भुसावळात 89, जामनेरात 67, एरंडोलमध्ये 79 असे विक्रमी संख्येने रुग्ण आढळले.

घसरणारा रिकव्हरी रेट चिंतेची बाब-

जळगाव जिल्ह्यातील रिकव्हरी रेट सातत्याने घसरत चालला आहे. मध्यंतरी जिल्ह्याचा रिकव्हरी रेट हा विक्रमी 98 टक्क्यांवर गेला होता. मात्र, अलीकडे वाढत जाणाऱ्या संसर्गामुळे हा रेट मोठ्या प्रमाणात घसरत चालला असून, तो सद्यस्थितीत 87.49 टक्क्यांवर आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.