ETV Bharat / state

जळगावातील 'त्या' बालिकेचा खूनच; अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल - जळगावात अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल

एका चार वर्षीय बालिकेचा मृतदेह ११ फेब्रुवारी रोजी ती राहत असलेल्या इमारतीमध्ये आढळला होता. पोलीस तपासात तिचा पाण्याच्या टाकीत बुडवून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. तिच्या घराशेजारी राहणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीनेच खेळता खेळता हे कृत्य केल्याचे उघडकीस आले असून अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावातील बालिकेचा खूनच
जळगावातील बालिकेचा खूनच
author img

By

Published : Feb 14, 2020, 11:46 PM IST

जळगाव - पिंप्राळा हुडकोमधील आरशीन शाबीर शाह या चार वर्षीय बालिकेचा मृतदेह ११ फेब्रुवारीला ती राहत असलेल्या बिल्डिंगमध्ये आढळला होता. पोलीस तपासात तिचा पाण्याच्या टाकीत बुडवून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. तिच्या घराशेजारी राहणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीने खेळता खेळता हे कृत्य केले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात मुलीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - 'आमचं उष्ट कुणी खाऊ नये', औरंगाबादच्या नामकरणावरुन मनसेवर 'सेनास्त्र'

पिंप्राळा हुडको येथील रहिवासी शाबीर शहा हबीब शहा यांची मुलगी ११ फेब्रुवारी रोजी अचानक बेपत्ता झाली होती. काही तासानंतर तिचा मृतदेह त्याच बिल्डिंगमध्ये आढळला होता. दरम्यान, शहा यांच्या शेजारी राहणाऱ्या जनाबाई भोई यांच्या घरी आरशीन हिचा मृतदेह १४ वर्षीय मुलीने आणला होता. तिला मृतदेह हा घराच्या जिन्यामध्ये सापडल्याचे तिने जनाबाई यांना सांगितले होते. मात्र, त्यानंतर तिने पुन्हा मृतदेह जिन्यात टाकून दिला होता, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली. त्यानुसार पोलिसांनी त्या मुलीची चौकशी केली, असता तिने आरशीनला खेळता खेळता पाण्यात बुडवल्याचे सांगितले.

या घटनेनंतर आरशीनच्या मृतदेहावर धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यातही तिचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी त्या मुलीला ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा - जळगाव महापालिकेला महिला कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीचा विसर!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.