जळगाव- मास्क न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आणि ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त काळ दुकाने उघडी ठेवणे यासह आदी नियमांचा भंग करणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. कारवाईत तब्बल २८ लाख १० हजार १३० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. तरीही काही नागरिक मास्क न वापरता वावरत आहेत. नियमांचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे, अशा नागरिकांना धडा शिकवण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या २५१ नागरिकांना ९४ हजार ९५० रुपयांचा दंड केला आहे. शासनाने ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ दुकाने उघडी ठेवणे, तसेच गर्दी जमवनाऱ्या ३८१ दुकानदारांना १ लाख ८४ हजार ५० रुपयांचा दंड केला आहे. तर गर्दीच्या ठिकाणी ३८१ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यात २ हजार ६५ प्रकरणात ५ लाख ८९ हजार ६६० रुपयांचा दंड करण्यात आला आहे. त्यामध्ये जळगाव शहरातील ५० हजाराच्या दंडाचा समावेश आहे.
हेही वाचा- अतिपावसामुळे जिल्ह्यातील ४५ हजार हेक्टरवरील उडीद, मुगाचे नुकसान