ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात शनिवारी 268 नवे कोरोना रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 9 हजार 451 - जळगाव कोरोना अपडेट

शनिवारी रात्री प्राप्त झालेल्या तपासणी अहवालांमध्ये 268 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आता 9451 इतकी झाली आहे.

corona
corona
author img

By

Published : Jul 25, 2020, 11:50 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वेगाने सुरूच आहे. जिल्हा प्रशासनाला शनिवारी रात्री प्राप्त झालेल्या तपासणी अहवालांमध्ये 268 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आता 9451 इतकी झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, शनिवारी देखील 10 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

जळगाव जिल्हा प्रशासनाला शनिवारी रात्री प्राप्त झालेल्या तपासणी अहवालांमध्ये सर्वाधिक 78 पॉझिटिव्ह रुग्ण हे जिल्ह्यातील हॉटस्पॉट असलेल्या जळगाव शहरात आढळले आहेत. त्याचप्रमाणे, जळगाव ग्रामीण 22, भुसावळ 20, अमळनेर 8, चोपडा 42, पाचोरा 7, भडगाव 19, धरणगाव 7, यावल 8, जामनेर 8, रावेर 15, पारोळा 2, चाळीसगाव 23, मुक्ताईनगर 6, बोदवड 2 तसेच इतर जिल्ह्यातील 1 अशा एकूण 268 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची शनिवारी पुन्हा भर पडली.

हेही वाचा - CORONA UPDATE : महाराष्ट्रात ९ हजार २५१ नवे कोरोनाबाधित.. ७ हजार २२७ रुग्णांना डिस्चार्ज

जिल्ह्यात आतापर्यंत 9451 इतके कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यातील 6043 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शनिवारी 209 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. जिल्ह्यातील सर्वाधिक 2442 इतकी रुग्णसंख्या एकट्या जळगाव शहरात आहे. त्यात 90 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1572 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 2948 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 460 जणांचा मृत्यू -

शनिवारी 10 जणांचा मृत्यू झाला. त्यात सर्वाधिक 3 जणांचे मृत्यू हे जामनेर तालुक्यातील आहेत. जामनेरातील 65 वर्षीय पुरुषासह 52 आणि 60 वर्षीय महिलांचा समावेश आहे. याशिवाय, जळगाव तालुक्यातील 42 व 62 वर्षीय महिलांचा देखील मृत्यू झाला आहे. तर एरंडोल, यावल, रावेर, धरणगाव आणि मुक्ताईनगर येथील प्रत्येकी एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.