जळगाव - जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग खूप वेगाने वाढत आहे. एकापाठोपाठ एक असे सातत्याने रुग्ण आढळत आहेत. गुरुवारी जिल्ह्यात तब्बल 22 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्या 232 झाली आहे.
जिल्ह्यात जळगाव, भुसावळ, रावेर, फैजपूर, चोपडा, अमळनेर, भडगाव, यावल येथील स्वॅब घेतलेल्या 78 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 56 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून, बावीस व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भुसावळ येथील एक, जळगाव शहरातील दर्शन कॉलनीतील दोन, गेंदालाल मील एक, पवननगर भागातील एक असे चार, चोपडा येथील सात, अडावद येथील एक, भडगाव शहरातील चार व निंभोरा येथील एक, फैजपूर एक, यावल एक आणि अमळनेर येथील दोन अशा एकूण 22 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 232 इतकी झाली असून, त्यापैकी 35 व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेल्या आहेत. तर 28 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांनी घाबरुन न जाता जागरूक रहावे. लॉकडाऊनचे पालन करावे. शक्यतो घराबाहेर पडू नये. अत्यंत आवश्यकता असेल तर घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा. जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करतांना सोशल डिस्टनिंगचे पालन करावे. दिवसातून चार ते पाच वेळा हात साबणाने स्वच्छ धुवावे. कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्यास त्वरीत तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या -
अंमळनेर 104 (कोरोनामुक्त 17)
भुसावळ 41 (कोरोनामुक्त 9)
जळगाव 44 (6 कोरोनामुक्त)
पाचोरा 20 (3 कोरोनामुक्त)
चोपडा 14 (शहर 9, अडावद 5)
मलकापूर 1
यावल 2 (शहर 1, फैजपूर 1)
भडगाव 6 ( शहर 4, 2 निंभोरा)
मृत्यू संख्या 28 वर -
जळगाव 4
अमळनेर 10
भुसावळ 8
चोपडा 3 (शहर 1,अडावद 2)
पाचोरा 3