ETV Bharat / state

जळगावात काल ६ वर्षीय बालिकेसह २० बाधितांचा मृत्यू; १००६ नवे रुग्ण - Girl dies Jalgaon Corona

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. दररोज कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडाही वाढत आहे. काल दिवसभरात ६ वर्षीय बालिकेसह २० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. काल नव्याने १ हजार ६ रुग्ण समोर आले आहेत. विशेष म्हणजे, काल नवीन आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. ही दिलासादायक बाब आहे.

Corona Patient Death Number Jalgaon
कोरोना मृत्यू आढावा जळगाव
author img

By

Published : Apr 29, 2021, 3:59 AM IST

जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. दररोज कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडाही वाढत आहे. काल दिवसभरात ६ वर्षीय बालिकेसह २० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. काल नव्याने १ हजार ६ रुग्ण समोर आले आहेत. विशेष म्हणजे, काल नवीन आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. ही दिलासादायक बाब आहे.

हेही वाचा - जळगावात अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; अपशकुनी समजून वडील छळ करत असल्याची मामाची तक्रार

जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत आहे. आज जळगाव शहर १७३, जळगाव ग्रामीण ४७, भुसावळ १३०, अमळनेर ६०, चोपडा ९७, पाचोरा ४७, भडगाव ११, धरणगाव ३३, यावल २५, एरंडोल ७३, जामनेर ३८, रावेर ७०, पारोळा २०, चाळीसगाव ५०, मुक्ताईनगर ९०, बोदवड ३५ आणि इतर जिल्ह्यातील ७, असे एकूण १००६ रुग्ण आढळून आले. तर, १ हजार १२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या १ लाख १९ हजार ९३४ इतकी झाली आहे. तर, १ लाख ७ हजार २६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

बाधित २३ रुग्णांचा मृत्यू

जिल्ह्यात काल २० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यात यावल तालुक्यातील एका ६ वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच, भुसावळ, यावल तालुक्यातील प्रत्येकी ३, जळगाव शहर, एरंडोल, जामनेर, पाचोरा तालुक्यातील प्रत्येकी २, तर अमळनेर, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, पोराळा व रावेर तालुक्यातील प्रत्येकी १ रुग्णाचा मृत्यू झाला.

हेही वाचा - जळगावात कडक निर्बंधांचे उल्लंघन, महापालिका प्रशासनाकडून 17 दुकाने सील

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.