ETV Bharat / state

जळगावात 16 ट्रकचे काच फोडले; माथेफिरू तरुणांचे कृत्य - crime

जळगाव शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात उभे असलेल्या 16 ट्रकांचे काच माथेफिरू तरुणांनी दगड मारून फोडले आहेत. बुधवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली आहे.

जळगावात 16 ट्रकांचे काच फोडले; माथेफिरू तरुणांचे कृत्य
author img

By

Published : Jun 20, 2019, 8:49 PM IST

जळगाव - शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात उभे असलेल्या 16 ट्रकचे काच माथेफिरू तरुणांनी दगड मारून फोडले आहेत. बुधवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली आहे. दरम्यान, याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या जनावरांच्या बाजाराजवळ सिंग ट्रान्सपोर्ट आणि रोहीत रोडवेअर कंपनीचे 16 ट्रक उभे होते. बुधवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात माथेफिरू तरुणांनी गोंधळ घालत या ट्रकचे काच फोडून नुकसान केले आहे.

हा प्रकार सुरू असताना ट्रक चालक मोहम्मद हारून यांनी काही तरुणांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकाने त्यांच्याशी वाद घालत त्यांच्यावर दगड भिरकावल्याने मोहम्मद हारून जखमी झाले आहेत. त्यानंतर आरडाओरडा करत तोडफोड करणारे तरुण पळून गेले आहेत.

गुरुवारी सकाळी औद्योगिक वसाहत पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरू आहे.

या ट्रकचे झाले नुकसान-
एचआर 38 एस 3741, एचआर 38 एस 6606, एमएच 40 एन 7707, एमएच 36 एफ 1440, एमएच 30 एबी 699, एमएच 40 वाय 8725, एनएल 02 क्यू 0179, एचआर 38 एस 0455, एनएल 01 एडी 680, एमएच 19 झेड 1776, एचआर 38 एस 9798, एचआर 38 वाय 5156, यूपी 78 बीटी 2251, यूपी 78 बीटी 2711, एमएच 31 सीक्यू 5826 या ट्रकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Intro:जळगाव
शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात उभे असलेल्या 16 ट्रकांचे काच माथेफिरू तरुणांनी दगड मारून फोडले. बुधवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. दरम्यान, याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे.Body:औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या गुरांच्या बाजाराजवळ सिंग ट्रान्सपोर्ट आणि रोहित रोडवेअर कंपनीचे 16 ट्रक उभे होते. बुधवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात माथेफिरू तरुणांनी गोंधळ घालत ट्रकांचे काच फोडून नुकसान केले. हा प्रकार सुरू असताना ट्रक चालक मोहम्मद हारून यांनी काही तरुणांना हटकले. मात्र, एकाने त्यांच्याशी वाद घालत त्यांच्यावर दगड भिरकावला. यात मोहम्मद हारून जखमी झाले. त्यानंतर आरडाओरडा करत तोडफोड करणारे तरुण पळून गेले. गुरुवारी सकाळी औद्योगिक वसाहत पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरू आहे.Conclusion:या ट्रकांचे झाले नुकसान-

एचआर 38 एस 3741, एचआर 38 एस 6606, एमएच 40 एन 7707, एमएच 36 एफ 1440, एमएच 30 एबी 699, एमएच 40 वाय 8725, एनएल 02 क्यू 0179, एचआर 38 एस 0455, एनएल 01 एडी 680, एमएच 19 झेड 1776, एचआर 38 एस 9798, एचआर 38 वाय 5156, यूपी 78 बीटी 2251, यूपी 78 बीटी 2711, एमएच 31 सीक्यू 5826 या ट्रकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.